गूगलने काही दिवसांपूर्वी त्यांच्या सर्चमध्ये नव्या सोयी जोडल्या आहेत ज्या शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी पडणार आहेत. सध्याच्या काळात घरून शिकण्यास देण्यात येणारं प्राधान्य लक्षात घेता नव्या सोयी गोष्टी समजून घेण्यासाठी वापरता येतील. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अशा विषयांचा समावेश आहे. मॅथ प्रॉब्लेमसाठी स्टेप बाय स्टेप मदत, केमिस्ट्रीसाठी आभासी 3D AR मॉडल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत! L.E.A.R.N. अंतर्गत त्यांनी ५ मार्गानी आपण सर्च करून एखादी गोष्ट कशा प्रकारे समजावून घेऊ शकतो हे सांगितलं आहे.
२००० हून अधिक कन्सेप्टबद्दल सर्च केल्यावर ही नवी माहिती समोर दिसेल. उदा chemical bonds असं सर्च केलं की संबंधित लेख, उपयोगी उदाहरणे, व्हिडिओ तुमच्यासमोर येतील.
दहा लाख प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स उपलब्ध. : उदा. chemical bond practice problems असं सर्च केल्यावर BBC Bitesize, Byjus, Careers360, Chegg, CK12, Education Quizzes, GradeUp, Great Minds, Kahoot!, OpenStax, Toppr, Vedantu यांच्यातर्फे उपलब्ध माहिती दिसेल जी थेट त्या त्या वेबसाईटवर घेऊन जाईल. सर्च केल्यावर तिथेच प्रॉब्लेम्स दिसतील आणि तुम्ही ते सर्च मध्येच सॉल्व करून उत्तरे तपासून पाहू शकाल!
AR चा वापर करून 3D मॉडल्स पाहता येतील : उदा. chemical bond सर्च केल्यावर View in 3D चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करताच chemical bond चं 3D मॉडेल तुमच्या घरी आलेलं दिसेल! chemistry, biology, physics and anatomy मधील जवळपास २०० कन्सेप्टयामध्ये समाविष्ट आहेत.
गूगलवर तुम्ही गणितामधील अडचण आलेले equations सुद्धा तपासून उत्तर मिळवण्यासाठी वापरू शकता. उदा. x^2-3x-4=0 असं सर्च केलं की ह्याचं उत्तर कसं येऊ शकतं हे सविस्तर स्टेप बाय स्टेप दाखवलं जाईल.
STEM प्रकारचे प्रश्नसुद्धा गूगलवर विचारता येतील जसे की “0.50 moles of NaCI are dissolved in 2.5 L of water, what is the molarity?” आणि मग यांची उत्तरेही मिळतील आणि संबंधित माहितीसाठी आणखी लेखांची लिंकसुद्धा दिसेल!