डीजेआय (DJI) या प्रसिद्ध ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपनीने नवा ड्रोन आणला असून या DJI FPV ड्रोनमध्ये आपल्याला फर्स्ट पर्सन व्ह्यू म्हणजे आपण स्वतः ड्रोनमध्ये बसून ड्रोन चालवत आहात असा व्ह्यू पाहत ड्रोन उडवता येईल! यामध्ये ड्रोनची कॅमेरा फीड DJI गॉगलच्या डिस्प्लेमध्ये लाईव्ह दिसेल. ड्रोन विश्वात हे नक्कीच अधिक सुंदर अनुभव देणारं उपकरण असणार आहे.
FPV ड्रोन बनवणारी DJI पहिली कंपनी नसली तरी ते अनेक लोकांना सहज वापरता येईल अशा स्वरूपात बाजारात उपलब्ध करून देण्याची क्रिया प्रथम DJI कडूनच होणार आहे. या ड्रोनसोबत आपल्याला FPV Goggles V2 (head-mount display), FPV Remote Controller 2 आणि एक Motion Controller घेता येईल. FPV Goggles मध्ये डिस्प्ले दिलेला आहे जो ड्रोन पाहत असलेले दृश्य आपल्याला लाईव्ह दाखवेल. Remote Controller नेहमीप्रमाणे ड्रोन नियंत्रित करेल तर नवा मोशन कंट्रोलर आपण जसा फिरवू त्या प्रमाणे ड्रोन उडवेल! या मोशन कंट्रोलरचा वापर हौशी ड्रोन यूजर्स नक्कीच नावीन्यपूर्ण प्रकारे केला जाईल. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही याचा वापर कशा प्रकारे केला जातो ते पाहू शकता.
ड्रोनचा कॅमेरा 1/2.3 इंची 12MP सेन्सर असलेला आहे. यामध्ये 150 अंशाचा फील्ड ऑफ व्ह्यू, 1-axis गिंबल दिलेलं आहे. याद्वारे 4K 60FPS, 1080 120FPS रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. FPV गॉगलची रेंज 10KM आहे.
DJI FPV Combo ची किंमत $1299 (~₹९५०००) इतकी आहे. या कॉम्बोमध्ये मोशन कंट्रोलर दिलेला नाही. तो स्वतंत्र घ्यावा लागेल आणि त्याची किंमत $199 (~₹१४५००)
याची भारतीय किंमअद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.