गेले काही दिवस चर्चा सुरू असलेला सॅमसंगच्या लोकप्रिय Galaxy S मालिकेतला नवा फोन Galaxy S21 आज सादर झाला आहे. आधीच बऱ्यापैकी सर्वच माहिती बाहेर पडली असल्यामुळे फक्त किंमत ही एकच गोष्ट जाहीर होणं बाकी होतं. हा फोन Galaxy S21, Galaxy S21 Plus आणि Galaxy S21 Ultra या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध होत आहे. या फोन्समध्ये Exynos 2100 या नव्या प्रोसेसरचा समावेश असून हे सर्व फोन 5G नेटवर्क सपोर्टसोबत मिळतील.
तिन्ही फोन्समध्ये 120Hz Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, Gorilla Glass Victus दिलेला आहे. S21 Ultra मध्ये WQHD+ डिस्प्ले, मुख्य कॅमेरा 108MP Wide सोबत 10MP Telephoto, 12MP Ultrawide आणि आणखी एक 10MP Telephoto लेन्स दिलेली आहे! यामध्येही 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेच.
यावेळी प्रथमच Galaxy S सिरीजच्या फोनमध्ये एस पेनचा सपोर्ट देण्यात आला आहे ज्यामुळे नोट्स घेणं, चित्रं काढणं सोपं होईल. गॅलक्सी नोट सिरिजमधील ही खास सोय आता या फोन्समध्येही जोडण्यात आली आहे! शिवाय नेहमी प्रमाणे उपलब्ध फोन्समध्ये सर्वोत्तम डिस्प्ले देण्याची परंपरा या वेळीसुद्धा सॅमसंगने सुरू ठेवली आहे.
ॲपलने आयफोन १२ पासून बॉक्समध्ये चार्जर देणं बंद केलं होतं त्याची टर उडवणारं ट्विट सॅमसंगतर्फे करण्यात आलं होतं आणि आता सॅमसंगनेच त्यांच्या Galaxy S21 बॉक्समध्ये चार्जर दिलेला नाही! आधी ॲपलनची चेष्टा करायची आणि पुन्हा स्वतः तेच करायचं असं सॅमसंगकडून आता बऱ्याचदा झालेलं पाहायला मिळालं आहे!
Evan Blass या फोन्स विश्वात सादर होण्यापूर्वी माहिती उघड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीने यावेळेही सॅमसंगच्या सर्व फोन्सचे सर्व फोटो व्हिडिओ सकट leak केले आहेत!
या कार्यक्रमात सॅमसंगने त्यांचे नवे इयरबड्स Galaxy Buds Pro सुद्धा सादर केले आहेत : https://youtu.be/rw-ZBoczHu4
Galaxy S21 Ultra Specs :
डिस्प्ले : 6.8″ Dynamic AMOLED 2X 120Hz WQHD+ 515ppi Display
प्रोसेसर : Exynos 2100
GPU : Mali G78 MP14
रॅम : 12GB/16GB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB/512GB UFS 3.1
कॅमेरा : 108MP Quad Camera + 12MP Ultrawide + 10MP Telephoto lens + 10MP Telephoto Lens
फ्रंट कॅमेरा : 40 MP f/2.2
बॅटरी : 5000mAh 25W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11, One UI 3.1
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, WiFi 6E, In Display Fingerprint Scanner, AKG Sound, USB Type C 3.2
सेन्सर्स : accelerometer, gyro, proximity, compass, barometer
रंग : Phantom Black, Phantom Silver
किंमत : हा फोन २९ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे.
Galaxy S21 ₹69,999
Galaxy S21+ ₹81,999
Galaxy S21 Ultra ₹1,05,999
Search Terms : Samsung Galaxy S21 launched with S Pen Support Galaxy S21 S21 Plus S21 Ultra india pricing