२०१७ मध्ये सुरुवात झालेल्या या तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमाच यंदा चौथं वर्ष आहे. यावेळी हा कार्यक्रम कोरोनामुळे आभासी पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्या, उच्चपदस्थ व्यक्ती, व्यक्ते यांची ऑनलाइन उपस्थिती असणार असून यावेळी सुद्धा मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं संशोधन यासंदर्भात भारतात सुरु असलेले प्रयत्न यांची ओळख करून देण्यात येईल.
हा कार्यक्रम भारतातला सर्वात मोठा तंत्रज्ञान कार्यक्रम असतो. २०२० चा हा कार्यक्रम ८ ते १० डिसेंबर २०२० दरम्यान चालेल. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसच्या धर्तीवर भारतात हा तंत्रज्ञान विषयक मोठा कार्यक्रम असेल. मोबाइल, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भाग घेऊन विविध प्रॉडक्ट/उत्पादने सादर करतील!
यावेळी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, रवी शंकर प्रसाद (मंत्री), संजय धोत्रे (मंत्री), अंशू प्रकाश (DCC चेअरमन), मुकेश अंबानी (रिलायन्स), सुनील मित्तल (एयरटेल), अजित पै (FCC) यांच्यासोबत नोकिया, एरिकसन, डेल, रेडहॅट, सिस्को, इंटेल, मीडियाटेक, टेक महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्याचे प्रमुख अधिकारी सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओ त्यांची 5G सेवा २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सुरू करणार असल्याचंही जाहीर केलं आहे.
अधिक माहिती : www.indiamobilecongress.com
search terns : India Mobile Congress #IMC2020 #Marathi #Technology #MWC