मायक्रोमॅक्सने गेले काही दिवस त्यांच्या नव्या ‘in‘ ब्रॅंड अंतर्गत येणाऱ्या फोन्सबद्दल माध्यमांमध्ये काही व्हिडिओद्वारे #MicromaxIsBack मार्फत चर्चा सुरू केली होती. भारतीयांसाठी भारतीय ब्रॅंड अशा प्रकारे मुद्दा पुढे ठेऊन आज त्यांचे दोन नवे स्मार्टफोन आले आहेत. in 1b आणि in Note 1 हे फोन्स बजेट फोन्समध्ये नवा पर्याय असणार आहेत. यामध्ये जाहिराती नसलेलं स्टॉक अँड्रॉइड देण्यात आलं असून दोन वर्षं अँड्रॉइड अपडेट्स देण्यात येणार आहेत. हा चांगला निर्णय मायक्रोमॅक्सने घेतला आहे. शिवाय किंमतसुद्धा कमी असल्यामुळे अनेकजण पुन्हा मायक्रोमॅक्सकडे वळू शकतील.
in 1b Specs :
डिस्प्ले : 6.52″ HD+ IPS LCD
प्रोसेसर : MediaTek Helio G35
रॅम : 2GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
कॅमेरा : 12MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 5000mAh 10W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
किंमत : हा फोन फ्लिपकार्टवर २४ नोव्हेंबरपासून उपलब्ध होत आहे.
2GB+32GB ₹ ६९९९
4GB+64GB ₹ ७९९९
in Note 1 Specs :
डिस्प्ले : 6.67″ FHD+ IPS LCD
प्रोसेसर : MediaTek Helio G85
रॅम : 4GB
स्टोरेज : 128GB/64GB
कॅमेरा : 48MP+5MP+2MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 18W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
किंमत : हा फोन फ्लिपकार्टवर २७ नोव्हेंबरपासून उपलब्ध होत आहे.
4GB+64GB ₹ १०९९९
4GB+128GB ₹ १२९९९
मायक्रोमॅक्सने सध्या मार्केटिंगसाठी फोन्सपेक्षा त्यांच्या भारतीय असण्याला जास्त अधोरेखित केलं आहे. त्यांच्या व्हिडीओ, मुलाखतीमधून तेच दिसून येत आहे. अर्थात यामध्ये वावगं नसलं तरी चांगलं उत्पादन सादर करण्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यायला हवं. जर उत्पादन चांगलं असेल तर भारतीय ग्राहकांना चिनी घेण्याचं कारणच नाही. चांगला डिस्प्ले, उत्तम प्रोसेसर, शक्यतो स्टॉक अँड्रॉइड, जास्त टिकणारी बॅटरी, आकर्षक मार्केटिंग आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नंतर मिळणारा सपोर्ट या गोष्टीवर खास लक्ष दिलं तर मायक्रोमॅक्स किंवा इतर भारतीय ब्रँड्सना सहज पुन्हा जागा मिळवता येईल!