बेबी शार्क (Baby Shark) नावाचा दक्षिण कोरियन कंपनी PinkFong ने नावाचा व्हिडिओ आता यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेला व्हिडिओ बनला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत तब्बल 7,26,32,61,909 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत! Despacito या Luis Fonsi च्या लोकप्रिय गाण्याला मागे टाकत त्यांनी आता प्रथम स्थान मिळवलं आहे!
२०१६ मध्ये अपलोड झालेलं हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रथम स्थानी पोहोचलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं Despacito च्या एक वर्ष आधी आलेलं आहे.
या सर्व व्ह्यूजच्या संख्येत आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली गाणी सर्वाधिक वेळा पाहिली गेली आहेत. भारतातल्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओजमध्येही हेच चित्र दिसून येतं. काही ठराविक चॅनेल्स सोडले तर लहान मुलांच्या चॅनेल्सना सबस्क्रायबर्ससुद्धा मोठ्या संख्येने आहेत.
www.youtube.com/kids
www.youtubekids.com
यूट्यूबने लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग करून दिला आहे जेणेकरून त्यांनी पाहू नये असे व्हिडिओ त्यांना दिसणार नाहीत. शिवाय आता व्हिडिओ अपलोड करतानासुद्धा तशा प्रकारे मार्क करावा लागतो की हा व्हिडिओ लहान मुलांसाठी योग्य आहे की नाही. अशा बऱ्याच व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद केलेला असतो.
यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेले व्हिडिओ
- Baby Shark Dance : Pinkfong Kids’ Songs & Stories
- Despacito : Luis Fonsi featuring Daddy Yankee
- Shape of You : Ed Sheeran
- See You Again : Wiz Khalifa featuring Charlie Puth
- Masha and the Bear : Recipe for Disaster : Get Movies
- Johny Johny Yes Papa : LooLoo Kids
- Uptown Funk : Mark Ronson featuring Bruno Mars
- Gangnam Style : Psy
- Learning Colors – Colorful Eggs on a Farm : Miroshka TV
- Sorry : Justin Bieber