गूगलने आज त्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमात नवे पिक्सल स्मार्टफोन्स, स्मार्ट स्पीकर्स, क्रोमकास्ट जाहीर केलं आहे. नवा Pixel 5 स्मार्टफोन व काही दिवसांपूर्वी आलेल्या Pixel 4a ची सुधारित 5G आवृत्ती आणली आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार शक्यतो हे दोन्ही फोन भारतात उपलब्ध होणार नाहीत. यांची किंमत Pixel 5 $699 (~५१४००) आणि Pixel 4a 5G $499 (~३७०००) इतकी आहे.
Pixel 5 मध्ये ६ इंची FHD+ OLED डिस्प्ले असून 90Hz रिफ्रेश रेट आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 765 हा प्रोसेसर असून याची रॅम 8GB आहे तर स्टोरेज 128GB असेल. मुख्य कॅमेरा 12MP + 16MP Ultrawide लेन्स दिलेली आहे. फ्रंट कॅमेरा 8MP आहे. 4080mAh ची बॅटरी असून 18W चं फास्ट चार्जिंग आहे. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
यामध्ये नव्याने दिलेली सोय म्हणजे Hold For Me आपण ज्यावेळी कस्टमर केयर सारख्या फोन नंबर्सवर कॉल केलेला असतो तेव्हा बराच वेळ होल्ड करून थांबावं लागतं या नव्या सोयीद्वारे गूगल आपल्याला समोरून कोणी बोलण्यास सुरुवात केली तर सांगेल!
Pixel 4a 5G मध्ये ६.२ इंची FHD+ OLED डिस्प्ले असून 90Hz रिफ्रेश रेट आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 765 हा प्रोसेसर असून याची रॅम 6GB आहे तर स्टोरेज 128GB असेल. मुख्य कॅमेरा 12MP + 16MP Ultrawide लेन्स दिलेली आहे. फ्रंट कॅमेरा 8MP आहे. 3885mAh ची बॅटरी असून 18W चं फास्ट चार्जिंग आहे. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
गूगलचा ऑगस्ट मध्ये सादर झालेला Pixel 4a १७ ऑक्टोबरला भारतात फ्लिपकार्टद्वारे उपलब्ध होणार आहे.
गूगलने आता अँड्रॉइड टीव्ही बंद करून त्याच्या जागी गूगल टीव्ही आणत असल्याच जाहीर केलं आहे. यावर आधारित असलेलं क्रोमकास्ट सादर करण्यात आलं असून हे पहिलं क्रोमकास्ट आहे ज्यामध्ये सोबत रिमोट मिळेल. या रिमोटमध्ये वॉइस कंट्रोल यूट्यूब व नेटफ्लिक्ससाठी बटन दिलेलं आहे. हे Chromecast With Google TV आता 4K HDR, Dolby Atmos, Dolby Digital Plus, Dolby Vision, HDR10+ आणि DTSX या सर्वांना सपोर्ट करेल! याची किंमत $49.99 (~३७००) असेल. याच्या भारतातील उपलब्धततेबाबत माहिती सांगण्यात आलेली नाही.