ॲक्शन कॅमेरासाठी प्रसिद्ध असलेल्या गोप्रोने त्यांच्या हिरो मालिकेत नवा GoPro Hero 9 कॅमेरा आणला आहे. गोप्रो हिरो ९ ब्लॅकमध्ये आता फ्रंट डिस्प्लेचाही समावेश करण्यात आला असून यामुळे व्लॉग करताना किंवा फ्रेम सेट करण्यासाठी चांगलाच उपयोग होईल. आता या कॅमेराद्वारे 5K रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ शूट करता येईल. शिवाय याची बॅटरी लाईफसुद्धा ३० टक्क्यानी वाढवण्यात आली आहे! लेन्स बदलण्याची सोय सुद्धा आता उपलब्ध करून दिलेली आहे!
गोप्रोच्या या नव्या कॅमेराद्वारे 20MP चे फोटो काढता येतील. यासोबत आता विविध मॉड्स उपलब्ध झाले असून मॅक्स लेन्स मॉड, मीडिया मॉड, लाईट मॉड, डिस्प्ले मॉड आपण बाहेरून जोडून कॅमेराची क्षमता आणखी वाढवू शकाल! HyperSmooth 3.0 मुळे हालचाल जास्त असलेला व्हिडीओ रेकॉर्ड करतानासुद्धा आणखी स्थिर/स्टेबल व्हिडीओ काढता येतील!
- 23.6MP Sensor
- 5K Video
- 20MP Photo
- 30% Longer Battery Life
- Front-Facing Display
- Removable Lens
- HyperSmooth 3.0
- Mod Ready
हा कॅमेरा ऑक्टोबरपासून मिळणार असून याची किंमत $499.98 (भारतातली किंमत ₹४९५००) असणार आहे. मॉड्सची किंमत भारतात Lens Mod ₹१०५००, Media Mod ₹८४००, Display Mod ₹६९००, Light Mod ₹४७०० अशी असेल.