लॉकडाऊनच्या वेळी वाढलेली मागणी लक्षात घेऊन गूगलने त्यांची व्हिडिओ कॉलिंग सेवा गूगल मीट सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. मे महिन्यापासून फ्री यूजर्ससाठीही कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र आता ३० सप्टेंबरनंतर केवळ १ तासाचाच व्हिडिओ कॉल मोफत करता येईल. ही लिमिट नको असेल तर आपल्याला पैसे मोजून अमर्यादित कॉल्सचा बिझनेस प्लॅन निवडावा लागेल.
अपडेट : गूगलने मोफत अमर्याद व्हिडिओ कॉलची मुदत आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे असं जाहीर केलं आहे.
हा लेख प्रकाशित केल्यावर गूगलकडून नव्या ब्लॉग पोस्ट द्वारे माहिती जाहीर
गूगलचा हा निर्णय अनेकांसाठी निराशाजनक असला तरी त्यांनी हे अचानक सांगितलेलं नाही. मे महिन्यात ज्यावेळी सर्वांना मोफत कॉलिंग सेवा मिळेल असं जाहीर करण्यात आलं तेव्हाच ही सेवा ३० सप्टेंबर पर्यंतच सर्वांना मोफत वापरता येईल असं सांगण्यात आलं होतं. आम्ही आधी प्रकाशित केलेल्या लेखामध्ये याची माहिती दिली होती.
मे महिन्यापासून जीमेल अकाऊंट असणारा प्रत्येक व्यक्ती मोफत व्हिडिओ मीटिंग सुरू करू शकत होता आणि त्यामध्ये १०० जण सहभागी होऊ शकायचे आणि यावर वेळेचं बंधन नव्हतं. आता ऑक्टोबर महिन्यापासून मोफत मीटिंगसाठी एक तास म्हणजे ६० मिनिटांची मर्यादा असेल. जर तुम्हाला मर्यादा नको असेल तर आधी प्रमाणेच G Suite या प्रीमियम सेवेचं सभासदत्व घ्यावं लागेल किंवा इतर उपलब्ध पर्याय वापरावे लागतील.
सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सेवांमध्ये फ्री प्लॅनसाठी खालील प्रमाणे वेळेचं लिमिट आहे.
- Google Meet : ६० मिनिटे : १०० व्यक्ती
- Zoom : ४० मिनिटे: १०० व्यक्ती
- Cisco WebX : ५० मिनिटे: १०० व्यक्ती
- Skype : ४ तास : ५० व्यक्ती
- Microsoft Teams : ४ तास : ५० व्यक्ती
अपडेट ३०-०९-२०२० आता काही वेळापूर्वी गूगलचे प्रॉडक्ट मॅनेजर समीर प्रधान यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे की फ्री यूजर्सना मार्च २०२१ पर्यंत मोफत अनलिमिटेड व्हिडिओ कॉल्स करता येतील. म्हणजेच ३० सप्टेंबरला संपत आलेली मुदत आता ३१ मार्च २०२१ रोजी संपेल.
