सॅमसंगने काल त्यांचा UV sterilizer भारतात सादर केला असून हा फोन्स, स्मार्टवॉच, इयरबड्स, गॉगलसारखी उपकरणे अवघ्या दहा मिनिटात निर्जंतुक करण्यासाठी वापरता येईल. हा युव्ही स्टरलायझर 10W वायरलेस चार्जर म्हणून सुद्धा काम करतो! उपकरणे स्वच्छ/निर्जंतुक करून झाल्यावरही हा आपली उपकरणे चार्ज करत राहील! याची किंमत ₹3,599 आहे.
सॅमसंगचा हा UV sterilizer E. coli, Staphylococcus aureus, and Candida albicans सारखे बॅक्टेरिया आपल्या उपकरणामधून ९९% काढून टाकू शकतो! यामध्ये आपण ७ इंच साईजपर्यंत डिस्प्ले असलेली उपकरणे निर्जंतुक करू शकतो. यात दोन UV Lights चा समावेश असून एकावेळी उपकरणाची वरची आणि खालची बाजूसुद्धा निर्जंतुक केली जाईल.
हे उपकरण पोर्टेबल असून आपण एका बटनद्वारे वापरू शकता. निर्जंतुकीकरण करून झाल्यावर १० मिनिटांनी हे आपोआप बंद होते. हा युव्ही स्टरलायझर ऑगस्ट महिन्यात सॅमसंगच्या ऑनलाइन व ऑफलाइन दुकानात उपलब्ध होईल.