मायक्रोसॉफ्टने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेला अँड्रॉइड स्मार्टफोन आता उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केलं असून हा फोन आता १० सप्टेंबरपासून खरेदी करता येईल. या फोनमध्ये दोन स्वतंत्र डिस्प्ले असून ते जोडलेले आहेत. यामुळे याची घडी घालता येते. हे दोन्ही डिस्प्ले 5.6 इंची आहेत आणिहे AMOLED पॅनल्स आहेत. 4:3 असपेक्ट रेशो आणि 1800×1350 रेजोल्यूशन आहे. यांना 360 अंशात फिरणाऱ्या hinge द्वारे जोडण्यात आलं असून एकत्रित 8.1 इंची PixelSense Fusion Display मिळतो.
यामध्ये Snapdragon 855 प्रोसेसर असून 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. 18W फास्ट चार्ज असलेली 3577mAh बॅटरी देण्यात आली आहे. Android 10 ही गूगलची ऑपरेटिंग सिस्टम यामध्ये देण्यात आली आहे हे विशेष! कॅमेरासाठी एकच 11MP सेन्सर देण्यात आला आहे! या फोनमध्ये सर्फेस पेन इनपुटचासुद्धा सपोर्ट आहे. इमेजेस, टेक्स्ट एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग अँड ड्रॉप करता येईल! या फोनची किंमत $1,399 (~₹ १,०४,९९९) इतकी ठेवण्यात आली आहे
याबाबत नवी माहिती आल्यानंतर अनेकांनी यामधील हार्डवेअर जुनं असल्याची तक्रार केली आहे. गेल्यावर्षी हा फोन मायक्रोसॉफ्टतर्फे जाहीर झाल्यानंतर इतका काळ उलटून गेल्यावरही यामध्ये जुनच हार्डवेअर तेसुद्धा मर्यादित स्वरूपाचंच आहे. याची किंमत सुद्धा बरीच जास्त आहे. यामध्ये खास गोष्ट असेल ती म्हणजे वापरण्याच्या दृष्टीने मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं खास सॉफ्टवेअर. दोन डिस्प्लेचा पुरेपूर वापर होईल अशा प्रकारे याचा युजर इंटरफेस डिझाईन करण्यात आला आहे.