परवा झालेल्या रिलायन्स जिओच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM 2020) त्यांनी Jio 5G, गूगलसोबत केलेल्या भागीदारीसह आणखी काही गोष्टी जाहीर केल्या त्या म्हणजे Jio Glass आणि Jio TV+. या लेखामध्ये यांच्याबद्दल जाणून घेऊ…
Jio Glass
Jio Glass हा मिक्स्ड रियालिटी (MR) हेडसेट असून यामध्ये असलेल्या हाय रेजोल्यूशन डिस्प्ले द्वारे आपण डोळ्यावर गॉगलप्रमाणे घालून कंटेंट पाहू शकाल. याचं वजन ७५ ग्रॅम्स असेल. सध्या Oculus सारख्या कंपनीने असे हेडसेट आणले आहेत मात्र जिओचं डिझाईन व्हिडिओमध्ये तरी अधिक सोपं आणि चांगलं वाटत आहे. या हेडसेटच्या मधोमध कॅमेरा देण्यात आला आहे. उजवीकडे बटन्स सुद्धा दिसत आहे. हा गॉगल घातल्यावर आपल्या डोळ्यासमोर असलेल्या डिस्प्लेमधून आपल्याला आभासी रूममध्ये उभे राहिलो आहोत असा अनुभव येईल. वास्तविक जगातील दृश्य यावेळी दिसत नसल्यामुळे पूर्णतः त्या आभासी जागेतच आहोत असं वाटेल.
सध्या याच्या बद्दल फारशी तांत्रिक माहिती जिओनी दिलेली नाही. केवळ याचा उपयोग कसा होईल याचा डेमो देण्यात आला. जिओ ग्लास द्वारे आपण Virtually प्रोजेक्ट्स दाखवू शकाल. मिटिंग्समध्ये सहभागी होऊ शकाल. याचा आणखी एक वापर म्हणजे सध्याच्या COVID19 लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या ऑनलाइन क्लासरूम्स. याद्वारे विद्यार्थी अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि शिक्षक थेट वर्गात शिकवत असल्याचा भास होईल असं सांगितलं आहे!
लॉंच होताना जिओ ग्लासमध्ये २५ अॅप्स असतील. यामध्ये कोणत्या अॅप्सचा समावेश असेल ते सांगण्यात आलेलं नाही. यावेळी देण्यात आलेल्या डेमोमध्ये आकाश अंबानी आभासी 3D अवतार द्वारे, ईशा अंबानी त्यांच्या लॅपटॉपवरून तर रिलायन्स प्रेसिडेंट किरण थॉमस जिओ ग्लासद्वारे एका आभासी मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही डेमो पाहू शकाल ज्यामधून अधिक चांगली कल्पना येईल.
Jio Glass Demo Video Link : https://youtu.be/17U3NpEv9f0?t=342
या जिओ ग्लास हेडसेटला इंटरनेटसोबत जोडण्यासाठी फोनचा वापर करू शकता. मात्र यासाठी वायर्ड कनेक्शन लागेल असं सध्या तरी दिसत आहे. येत्या काही महिन्यात याची अधिक माहिती, याच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या सेवा , अॅप्स यांची दिली जाईल त्यानंतरच याची क्षमता आणि उपयोग अधिक चांगल्या प्रकारे समजेल. याची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
Jio TV+
याच कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेली गोष्ट म्हणजे Jio TV+. याद्वारे जिओ १२ पेक्षा जास्त OTT कंपन्याचा कंटेंट उपलब्ध करून देईल यामध्ये Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Voot, SonyLiv, Zee5, JioCinema, JioSaavn, YouTube यांचा समावेश आहे.
जिओ टीव्ही प्लस द्वारे आपल्याला आवडीचा कंटेंट म्हणजे चित्रपट, मालिका, लाईव्ह टीव्ही शो शोधणं सोपं होईल. ग्राहकांना आवडणाऱ्या सर्व सेवा एक ठिकाणी उपलब्ध करून देणारा प्लॅटफॉर्म असेल. यामध्ये व्हॉईस सर्चची सोय सुद्धा जोडण्यात आलेली आहे ज्यामुळे तुम्ही आवाजाद्वारे कमांड देऊन आवडीचा चित्रपट/मालिका सुरू करू शकाल! अॅक्टरचं नाव सांगून त्यांचे चित्रपट शोधणं त्यांचे ट्रेलर्स पाहणं अशा गोष्टी करता येतील.
ही सेवा फक्त Content Aggregation म्हणजे थोडक्यात कंटेंट शोधून एका जागी दाखवण्याचं काम करेल. आपल्याला त्या त्या कंटेंट साठी स्वतंत्र पैसे मोजावे लागणार आहेतच. Jio TV+ चं डिझाईन अॅपल टीव्हीप्रमाणे दिसत असल्याचंही अनेकांनी लक्षात आणून दिलं आहे. जिओ मीटसाठी झुमच्या UI ची कॉपी केल्यावर आता अॅपल टीव्हीच्या UI ची कॉपी Jio TV+ मध्ये पाहायला मिळेल!
Search Terms : What is Jio Glass Jio Glass Price availability