सॅमसंगने Galaxy M01 सादर करून एक महिना होतोय तोवर याची नवी आवृत्ती आणली असून Galaxy M01s आज भारतात सादर झाला असून सॅमसंगच्या प्रसिद्ध M मालिकेतील स्वस्त फोन असेल. यामध्ये आता Mediatek प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे! याची किंमत ९९९९ एव्हढी असेल.
या फोनमध्ये 6.2″ HD+ PLS TFT डिस्प्ले असून याचं रेजोल्यूशन 1520×720 आहे. 13MP+2MP बॅक कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. MediaTek Helio P22 प्रोसेसर, 3GB रॅम, 32GB स्टोरेज आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये Android 10 देण्याऐवजी Android 9 देण्यात आलं आहे! शिवाय बॅटरीसुद्धा स्पर्धेच्या मानाने कमी म्हणजे 4000mAh देण्यात आली आहे जी चार्ज करण्यासाठी MicroUSB पोर्ट आहे.
सध्या चीनी फोन्सला असलेला विरोध लक्षात घेता सॅमसंगने बाजार काबिज करण्यासाठी चांगले फोन्स आणणं गरजेचं आहे मात्र आम्ही व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे सॅमसंग या वेळेचा गैरफायदा घेत कमी फीचर्स असलेले फोन ग्राहकांना विकत आहे. उत्तम ब्रॅंडसाठी आता तितकी स्पर्धा नाही. तरी सॅमसंगने फोन्स आणि किंमतीमध्ये आता बदल करणं अपेक्षित आहे नाहीतर ग्राहकवर्ग पुन्हा चीनी फोन्सकडेच वळणार ही स्पष्ट होत आहे.
डिस्प्ले : 6.2″ HD+ PLS TFT Inifinity V Display
प्रोसेसर : Mediatek Helio P22
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Light Sensor, Proximity Sensor
रंग : Grey, Light Blue
किंमत : हा फोन सॅमसंग वेबसाइट, ऑफलाइन दुकानं येथे उपलब्ध होत आहे.
3GB+32GB ₹९९९९