निकॉनने त्यांच्या नवा मिररलेस कॅमेरा Nikon Z5 आज सादर केला असून हा 24.3MP फुल फ्रेम कॅमेरा असेल. बऱ्यापैकी Z6 प्रमाणेच सोयी असलेल्या या कॅमेरामध्ये ड्युयल UHS-II SD मेमरी कार्ड स्लॉट्स आहेत. Z मालिकेतला हा पहिलाच कॅमेरा आहे ज्याला दोन मेमरी कार्ड जोडता येतात. यामध्ये ISO 100-51200, Eye-Detection AF Animal-Detection AF, Quad-VGA EVF, USB power delivery, Weather sealing अशा सुविधा आहेत. निकॉन या कॅमेराला एंट्री लेव्हल फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा म्हणत आहे! Z6, Z7 आणि Z50 नंतर आता हा Z5 कॅमेरा Z मालिकेत जोडला जाईल.
हा कॅमेरा 4K 30p व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो मात्र याला 1.7x crop factor असेल. यामध्ये burst rate सुद्धा कमी म्हणजे 4.5fps इतका आहे. Z6 प्रमाणे कॅमेरा डायलच्या बाजूला डिस्प्लेसुद्धा नाही. मुख्य LCD चं सुद्धा रेजोल्यूशन कमी करण्यात आलं आहे. बऱ्याच गोष्टी कमी करून स्वस्त Z6 उपलब्ध करून देण्यात आला आहे असं दिसत आहे. या कॅमेराला Type C पोर्ट देण्यात आलं असून याद्वारे प्रथमच यूएसबीद्वारे चार्जिंगसुद्धा देण्यात आलं आहे. या कॅमेराची किंमत $1,399.95 (~१,१०,०००) इतकी आहे.
यासाठी नवी किट लेन्स देण्यात आली असून ही सर्वात लहान Z mount लेन्स आहे. 24-50mm f/4-6.3 zoom लेन्स सह कॅमेराची किंमत $1,699.95 (~१,२८,०००) इतकी असेल.