गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या सहाव्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या आहेत. गूगल आता देशातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम करणार आहे. यासोबत गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी यावेळी भारतात तब्बल ७५००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे!
भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गूगल आता नवा फंड सुरु करत असून याचं नाव Google for India Digitization Fund असं असणार आहे. याद्वारे येत्या पाच ते सात वर्षात ७५००० कोटींची गुंतवणूक गूगल करणार आहे.
या गुंतवणुकीद्वारे भारताला डिजिटल बनवण्यासाठी प्रमुख चार गोष्टी असतील
- भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत माहिती उपलब्ध करून देणे
- भारतीयांच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्पादने आणि सेवा तयार करणे
- डिजिटल बदलासाठी व्यवसायांना प्रोत्साहन देणे
- आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चांगल्या गोष्टीत अंमलात आणणे
या प्रमुख घोषणेसह त्यांनी असंही जाहीर केलं आहे की गूगल आता दहा लाख CBSE शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण देणार आहे!
सोबत आजवर गूगल इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची, गुंतवणुकीची आणि सेवांची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल हे सुद्धा व्हिडिओमार्फत सहभागी झाले होते.
Google For India 2020 अधिक माहिती : https://bit.ly/3foWoTN