भारत सरकारच्या टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने काही दिवसांपूर्वी एक ॲप आणलं असून याद्वारे डीटीएच व केबल ग्राहकांना वाहिन्या निवडणं सोपं होणार आहे. या ॲपचं नाव TRAI Channel Selector असं आहे. यामुळे तुम्ही तुमच्या पॅकेजमधील वाहिन्यांची निवड करू शकता, वाहिन्या काढून टाकू शकता. हे ॲप अँड्रॉइड व iOS वर उपलब्ध आहे.
TRAI Channel Selector on Google Play : https://bit.ly/384Ue94
TRAI Channel Selector on App Store : https://apple.co/2VqHOTF
ग्राहकांना योग्य पॅकेजची निवड करणं अवघड होत असल्याचं दिसून आल्यामुळे हे ॲप उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं ट्राय तर्फे सांगण्यात आलं आहे. यामुळे पॅकेज किंवा बुके निवडणं त्यामधील चॅनल्स निवडणं शक्य असल्यामुळे ग्राहकांचा दर महिना खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
सध्या या ॲपमध्ये टाटा स्काय, डिश टीव्ही, d2h आणि एयरटेल टीव्ही यांच्यासोबत हॅथवे, सिटी नेटवर्क, इन डिजिटल आणि एशियानेट यांचाच सहभाग आहे इतर ऑपरेटर लवकरच सहभागी होतील.