गेले काही दिवस लॉंच पुढे ढकलल्यानंतर आज सोनीचा पुढचा प्लेस्टेशन गेमिंग कॉन्सोल PS5 सादर करण्यात आला आहे. यापूर्वी फक्त कंट्रोलरचीच माहिती देण्यात आली होती आता मात्र कॉन्सोलसोबत उपलब्ध होणाऱ्या गेम्सचीही झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये एक डिजिटल एडिशनसुद्धा आणली असून यामध्ये डिस्कशिवाय गेम्स इंस्टॉल करून खेळता येतील म्हणजेच ही पूर्ण ऑनलाइन असेल!
मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्सच्या येणाऱ्या सिरीज एक्स नावाच्या कॉन्सोलसोबत PS5 ची स्पर्धा असेल. दोन्ही कॉन्सोल्स आधीच्या आवृत्त्यापेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली असणार आहेत आणि आता हे थेट 8K रेजोल्यूशन पर्यंतसुद्धा सपोर्ट देत आहेत.
Sony PlayStation PS5 Hardware Reveal Trailer : https://youtu.be/RkC0l4iekYo
या PS5 कॉन्सोलसोबत त्यांनी इतर उपकरणे जसे की कंट्रोलर, 3D हेडफोन, एचडी कॅमेरा आणि एक मीडिया रिमोटसुद्धा सादर केला आहे! या कॉन्सोलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा हॉलिडे 2020 (नोव्हेंबर/डिसेंबर) वेळी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे.
PS5 सोबत जाहीर करण्यात आलेल्या गेम्सचे ट्रेलर
- Marvel’s Spider-Man: Miles Morales – Announcement Trailer | PS5
- Horizon Forbidden West – Announcement Trailer | PS5
- Demon’s Souls – Announcement Trailer | PS5
- Resident Evil Village – Announcement Trailer | PS5
- Astro’s Playroom – Announcement Trailer | PS5
- NBA 2K21 – Announcement Trailer | PS5
- Project Athia – Teaser Trailer | PS5
- Stray – Teaser Trailer | PS5
- Destruction AllStars – Announcement Trailer | PS5
- Kena Bridge of Spirits – Announcement Trailer | PS5
- Gran Turismo 7 – Announcement Trailer | PS5
Search Terms : Sony PlayStation 5 gaming console launched with so many games, to compete with Xbox Series X