गेल्या काही दिवसात सॅमसंगने बजेट फोन्सच्या Galaxy A मालिकेत अनेक फोन्स सादर केले असून आज त्यांनी आणखी एक फोन भारतात सादर केला आहे. नवा Galaxy A21s मध्ये HD+ डिस्प्ले, Exynos 850 प्रोसेसर आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत १६४९९ (4GB+64GB) आणि १८४९९ (6GB+64GB) अशी असणार आहे. हा फोन आजपासून फ्लिपकार्ट, सॅमसंग वेबसाईट आणि ऑफलाइन दुकानांमध्ये उपलब्ध होत आहे.
A21s मध्ये 6.5-inch HD+ LCD डिस्प्ले असून पूर्वीच्या आणि सध्याही लॉंच होणाऱ्या बऱ्याच सॅमसंग फोन्समध्ये देण्यात येणारा AMOLED डिस्प्ले देण्यात आला नाही हे विशेष! या फोनमध्ये मागे चार कॅमेरे असून 48MP+8MP+2MP+2MP असा क्वाड कॅमेरा सेटप आहे. फ्रंट कॅमेरा 13MP असून पंच होल डिस्प्लेमध्ये डाव्या बाजूस दिलेला आहे. फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी असून सोबत 15W फास्ट चार्जिंग आहे. स्टोरेजला सध्यातरी 64GB चाच पर्याय आहे!
अलीकडे सॅमसंग सादर करत असलेले फोन्स बऱ्यापैकी सारखेच आहेत. गेल्या काही दिवसात थोडेफार बदल करून अधिक किंमत लावून जवळपास सारखेच फोन्स विक्रीस आणत असल्याचंही दिसून येत आहे. चीनी फोन्सना होणारा विरोध लक्षात घेता सॅमसंगला पुन्हा प्रथम स्थान मिळवणं सहजशक्य आहे तरी ग्राहकानांसुद्धा सॅमसंगने तसा पर्याय नव्या सुविधा आणि योग्य किंमत पुरवावी.
Samsung Galaxy A21s Specs
डिस्प्ले : 6.5″ HD+ LCD Display 720 x 1600
प्रोसेसर : Exynos 850
GPU : ARM Mali-G52 MP1
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide, 2MP Macro Lens + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 13MP
बॅटरी : 5000mAh with 15W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम :OneUI based on Android 10
इतर : Wifi, Bluetooth 5.0, Fingerprint Scanner, Dolby Atmos
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Proximity Sensor, Virtual Light Sensing
रंग : Black, Blue White
किंमत : हा फोन आजपासून फ्लिपकार्ट, सॅमसंग वेबसाइट आणि ऑफलाइन दुकानांमध्ये उपलब्ध होत आहे.
4GB+64GB 4G ₹ १६९९०
6GB+64GB 4G ₹ १८९९०