व्हिडिओ कॉलिंगचं सध्याचं वाढलेलं मार्केट ताब्यात घेण्यासाठी कंपन्या रोज नव्या सुविधा जोडत आहेत. आता गूगलने त्यांच्या जीमेल सेवेच्या अँड्रॉइड आणि iOS ॲपमध्ये त्यांची व्हिडिओ कॉलिंग सेवा गूगल मीट (Google Meet) जोडून दिली आहे. यामुळे तुम्हाला थेट जीमेलमधूनच तुमच्या मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी ग्रुप व्हिडिओ कॉल सुरू करता येईल! यामुळे मीटिंग जॉईन करण्यासाठी स्वतंत्र गूगल मीट ॲप घ्यावं लागणार नाही.
जीमेलद्वारे एखाद्या मीटिंगचं invite आलं की लिंक वर क्लिक करून लगेच त्या मीटिंगमध्ये सहभाग होऊ शकाल! काही दिवसांपूर्वीच गूगलने ही सेवा जीमेलच्या डेस्कटॉप वेबसाइटवरसुद्धा जोडली आहे. गूगल मीट मोफत उपलब्ध करून दिल्यापासून याचा वापर करण्याचं प्रमाण वाढत आहे. गूगल यामध्ये अनेक नव्या सोयीसुद्धा जोडल्या आहेत. सर्व प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध असणं याचं प्रमुख वैशिष्ट्य. मराठीटेकच्या यूट्यूब चॅनलवरही यासंबंधी व्हिडिओ प्रकाशित केला आहे तो नक्की पहा : https://youtu.be/B52aPV9flqk
यासोबत त्यांनी गूगल ड्युओ या ॲपच्या डेस्कटॉप वेबसाइटवरून ग्रुप कॉलमधील सहभागी होऊ शकणाऱ्या सदस्यांची संख्या आता ३२ केली आहे! फोनवर मात्र अजूनही ही मर्यादा १२ चीच ठेवण्यात आली आहे. मात्र येत्या काही आठवड्यात फोनवरील ॲपमध्येही ही मर्यादा ३२ पर्यंत वाढवली जाणार असल्याचं गूगलतर्फे सांगण्यात आलं आहे!
वेबसाइट लिंक : duo.google.com
Search Terms : Google meet now available inside Gmail Android and iOS Apps