स्पेसएक्सच्या यानातून नासाचे दोन अंतराळवीर आज अंतराळात झेप घेणार आहेत. इतिहासात प्रथमच एका खाजगी संस्थेद्वारे अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहेत. Bob Behnken आणि Doug Hurley ही दोन अंतराळवीर या मोहिमेमध्ये सहभागी अंतराळवीर आहेत. यासंबंधी लाईव्ह स्ट्रीम सुरू झाली असून केनेडी स्पेस सेंटरपर्यंतचा प्रवास टेस्ला मॉडेल एक्स या कारमधून करण्यात येत आहे. हा लेख अपडेट करत असताना प्रक्षेपणास १२ मिनिटे शिल्लक आहेत.
अपडेट १ : प्रतिकूल हवामानामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. पुढील प्रयत्न आज म्हणजे ३१ मे रोजी करण्यात येईल.
अपडेट २ : ३१-०५-२०२० : हे प्रक्षेपण यशस्वी झालं असून दोन्ही अंतराळवीर आता स्पेस स्टेशनच्या दिशेने प्रवास करत असून त्यांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडून स्पेसएक्सचं रॉकेट पृथ्वीवर आय स्टिल लव्ह यू या ड्रोनशिप परतलं आहे असून हे परत वापरणंसुद्धा आता शक्य आहे! आणखी काही तासांनी हे अंतराळवीर स्पेसस्टेशनजवळ पोचतील आणि त्यांचं स्पेस क्राफ्ट स्पेसस्टेशनला जोडलं जाऊन ते त्यामध्ये प्रवेश करतील.
अपडेट ३ : ३१-०५-२०२० : दोन्ही अंतराळवीर आता इंटरनॅशनल स्पेसस्टेशनजवळ पोहोचले असून काही मिनिटात डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल! #ISS #InternationalSpaceStation
अपडेट ४ : ३१-०५-२०२० : क्रू ड्रॅगन आणि इंटरनॅशनल स्पेसस्टेशनची डॉकिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून काही वेळातच अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश करतील.
३१-०५-२०२०
लाईव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी लिंक : https://youtu.be/rjb9FdVdX5I
स्पेसएक्स (SpaceX) ही कंपनी इलॉन मस्कनी स्थापन केली आहे. जवळपास नऊ वर्षांनी मानवी अंतराळ मोहीम पार पाडण्यात येणार असून ही घटना नक्कीच ऐतिहासिक असणार आहे. या मोहिमेचं नाव Demo 2 असं असून स्पेसएक्सच्या Falcon 9 या रॉकेटद्वारे Crew Dragon या स्पेसक्राफ्टद्वारे दोन अंतराळवीर अवकाशात झेप घेतील! अवकाशात प्रवास करत ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोचतील जिथे सध्या एक अंतराळवीर आधीच असून आता एकूण तीन अंतराळवीर स्पेस स्टेशनमार्फत पृथ्वीकडे लक्ष ठेवतील!
लाईव्ह अपडेट्ससाठी लिंक्स