गूगल मीट या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवेचा कसा वापर करायचा ते पहा… झुमपेक्षा सुरक्षित आणि सोपा पर्याय म्हणजे Google Meet, एकावेळी तब्बल १०० जण यामध्ये सहभागी होऊ शकतात!
गूगलने सध्याच्या काळात वाढत चाललेली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवांची मागणी लक्षात घेऊन त्यांची Google Meet ही सेवा आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं आहे. गूगल मीट सेवा वापरण्यासाठी तुम्ही meet.google.com वर जाऊ शकता किंवा त्यांचं अँड्रॉइड व iOS अॅप वापरु शकता. गूगल मीट वापरण्यासाठी गूगल अकाऊंट असणं गरजेचं आहे. तुम्ही जीमेल साठी तयार केलेलं अकाऊंट जीमेल, यूट्यूब, प्ले स्टोअर, डॉक्स, ड्राइव्ह अशा सर्व गूगल सेवांमध्ये वापरू शकता.
गूगल मीटबद्दल अधिक माहिती : https://bit.ly/3fhxtlB
व्हिडिओसाठी स्वप्निल भोईटे, प्रतिक देशमुख, कौस्तुभ शिंदे, योगिराज करजगी, नीरज बुटे, सचिन निंबर्गी यांचे मनापासून आभार!
Video Link : https://youtu.be/B52aPV9flqk
How to use Google Meet, How to use Google Meet for FREE, How to use Google Meet on Android or iPhone, Display your Powerpoint, Documents, Images, Videos with Screen Sharing, Live Chat Available! How to use Google Meet in Marathi
Nice article. .
कृपया g Suite कस वापरायच याचा एक व्हिडिओ बनवा
नक्की प्रयत्न करू. सूचनेबद्दल धन्यवाद.