फेसबुकने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार फेसबुक आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वस्तू विकण्यासाठी Facebook Shops नावाची नवी सेवा सुरू करत आहे. यामुळे व्यावसायिक आता त्यांचं ऑनलाइन दुकान सुरू करू शकतील ते सुद्धा फेसबुक व इंस्टाग्रामवरून! शिवाय ही सेवा लवकरच मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर सुद्धा दिली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्याच्या हेतूने ही सेवा सुरू करत असल्याच फेसबुकतर्फे सांगण्यात आलं आहे.
कोरोनामुळे लहान व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे त्यासाठी त्यांना फेसबुक, इंस्टाग्रामवर आपली उत्पादने विकता येण्यासाठी सहज सोपा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सेवेची सुरुवात अमेरिकेपासून करण्यात येत आहे. भारतात सध्यातरी या सेवेबाबत घोषणा केलेली नाही.
फेसबुक शॉप्स म्हणजे नेमकं काय ? : फेसबुक शॉप्स हा लहान व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला मोफत प्लॅटफॉर्म आहे जो त्यांच्या इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप या इतर सेवांमध्येही जोडलेला असेल. यामुळे आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजेसवर आपल्याला वस्तू विक्रीला ठेवता येतील.
फेसबुक शॉप्स कशा प्रकारे काम करतील? : फेसबुक शॉप्स मोफत तयार करता येतील. शॉप तयार केल्यावर व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांची माहिती अपलोड करता येईल. आपल्या आवडीप्रमाणे काही बदल करता येतील. फोटोज अपलोड करता येतील. ग्राहक त्या व्यावसायिकाच्या फेसबुक पेजला भेट देऊन उत्पादने पाहू शकतील. आवडलेली वस्तू तिथल्या तिथे ऑर्डर करू शकतील. पुढे पुढे आपण फेसबुकवर करत असलेल्या पोस्टमध्येही वस्तू टॅग करू शकाल. लवकरच व्हॉट्सअॅप, मेसेंजर, इंस्टाग्रामला ही सेवा जोडली जाऊन तिथेही आपल्या ऑर्डर ट्रॅक करता येतील!
लाईव्ह शॉपिंग नावाच्या पर्यायाद्वारे फेसबुक लाईव्ह दरम्यानसुद्धा आपली उत्पादने दर्शवून विक्री करता येईल. लॉयल्टी प्रोग्राम व रिवॉर्डस जोडता येतील.
फेसबुक यासाठी Shopify, BigCommerce, WooCommerce, ChannelAdvisor, CedCommerce, Cafe24, Tienda Nube आणि Feedonomics सारख्या कंपन्यासोबत काम करत आहे.
Search Terms What is facebook shops how facebook shop works how to start a facebook shop facebook instagram shops in india