फेसबुकने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या लोकप्रिय मेसेंजर सेवेची डेस्कटॉप आवृत्ती सादर केली ही आता अॅपलच्या मॅक व मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध झाली आहे. अलीकडे लॉकडाऊनमुळे अचानक प्रसिद्ध झालेल्या झुमची लोकप्रियता पाहून अनेकांनी त्यांच्या सेवांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकचंही हे पाऊल त्यासाठीच असल्याचं सांगण्यात येत आहे.
फेसबुकचे अधिकारी स्टॅन चुडनोवस्की (उपप्रमुख, फेसबुक मेसेंजर) यांनी असं सांगितलं की कधी नव्हे तेव्हढया प्रमाणात लोक एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी टेक्नॉलजीचा वापर करत आहेत. गेल्या महिन्यापासून डेस्कटॉप ब्राऊजरद्वारे ऑडिओ/व्हिडिओ कॉल्सचं प्रमाण १०० टक्क्यानी वाढलं आहे म्हणूनच आम्ही आता मॅक व विंडोज अॅपद्वारे मोफत अमर्याद ऑडिओ व व्हिडिओ ग्रुप कॉल्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुक मेसेंजरच्या काही सुविधा :
- ग्रुप व्हिडिओ कॉल्स आता मोठ्या स्क्रीनवर
- कनेक्ट होण्यासाठी सोपा मार्ग
- मल्टीटास्किंग : इतर कामे करत असताना आपण चॅट करू शकता
- नोटिफिकेशन्स : नवीन मेसेज, कॉल्स, चॅटची अलर्टद्वारे माहिती
- चॅट Sync : मोबाइल व डेस्कटॉपवर चॅट आपोआप Sync केले जातील
- डार्क मोड व GIF सुद्धा उपलब्ध!
फेसबुक मेसेंजर मायक्रोसॉफ्ट स्टोअर व मॅक अॅप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
Search Terms : New Messenger Desktop App for Group Video Calls and Chats launched by Facebook