भारत सरकारने सोमवारी सर्व विमान कंपन्यांना विमानामध्ये वायफाय सेवा पुरवण्यास पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. प्रवाशांसाठी ही नक्कीच चांगली गोष्ट असेल कारण काही लांबच्या प्रवासादरम्यान अनेक तास कसल्याही संपर्काशिवाय काढावे लागायचे. याआधी विमान कंपन्याना भारतातून निघणाऱ्या विमानामध्ये वायफाय सेवा देण्यास बंदी घालण्यात आली होती.
विमानाचा पायलट विमानामध्ये वायफायद्वारे इंटरनेट सेवा सुरू करून प्रवाशांना लॅपटॉप, फोन, स्मार्टवॉच, टॅब्लेट अशा उपकरणांना जोडलं जाण्यासाठी सेवा देऊ शकतील असं जाहीर केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं आहे.
यानंतर आता कोणी कशा प्रकारे वायफाय सेवा द्यायची/ द्यायची की नाही हे विमान कंपनीवर अवलंबून असेल. काही जण यासाठी पैसे घेतील तर कदाचित काही जण मोफतसुद्धा पुरवू शकतील. विस्तारा विमान कंपनीने तर ही सेवा देण्यास सुरुवातसुद्धा केली आहे. विस्तारा प्रमुखांनी याबद्दल माहिती दिली आहे.
विमानामधील वायफाय सेवा वापरण्यासाठी तुमचा फोन एयरप्लेन मोडवर ठेवलेला असावा. विमानात बसल्या बसल्या तुम्ही संबंधित वायफाय सेवेला जोडले जा आणि काही प्लॅन्स असतील तर विकत घेऊन ठेवा म्हणजे नंतर विमान हवेत असताना येणाऱ्या व्यत्ययाचा त्रास होणार नाही. याची अधिक माहिती त्या त्या विमान कंपनीच्या वेबसाइटवर पहा.
Indian governments now allows Airline Companies to provide in flight wifi service to passengers