जीबोर्ड (Gboard) या गूगलच्या किबोर्ड अॅपमध्ये आता आपल्याला स्वतःच्या इमोजी तयार करता येणार आहेत! या नव्या सुविधेला गूगलने इमोजी किचन असं नाव दिलं असून शब्दशः आपण इमोजींची भेळ या किचनमध्ये तयार करता येते. या किबोर्डद्वारे टाइप करताना एखादी इमोजी निवडा गूगल त्याला अनुसरून तुम्हाला विविध पर्याय समोर दाखवेल जे दुसऱ्या काही इमोजी मिसळून तयार केलेले असतील.
तुमच्या अँड्रॉइड फोनवर Gboard वापरताना कोणत्याही स्मायली असलेल्या इमोजीवर टॅप करा आणि इमोजी किचन तुम्हाला गूगलच्या डिझाईनर्सनी खास तयार केलेल्या इमोजींचे पर्याय मिळतील. समजा तुम्ही काऊबॉय इमोजी निवडली तर लगेच तुम्हाला हसणारा काऊबॉय, रडणारा काऊबॉय, प्रेमात पडलेला काऊबॉय अशा अनेक भन्नाट इमोजी तयार करून मिळतील! मग त्यातील आवडती इमोजी निवडून तुम्ही जीमेल, मेसेजेस, मेसेंजर, स्नॅपचॅट, टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर काही अॅप्समध्ये पाठवू शकता!