आज झालेल्या कार्यक्रमात realme 5i हा स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला असून हा realme 5 मालिकेतील realme 5, realme 5 Pro व realme 5s नंतरचा चौथा फोन असेल. हा नवा फोन खरतर realme 5 प्रमाणेच असून केवळ नवीन डिझाईन आणि 4GB रॅम हे वेगळेपण आहे. सध्या realme 5 फोन 3GB रॅम ८९९९ ला मिळतो तर नवा फोन नवं डिझाईन व 4GB रॅम सह ८९९९ लाच मिळणार आहे. जुन्या मॉडेलची किंमत कमी करण्याऐवजी तसाच नवा फोन आणून ग्राहकांना आणखी गोंधळात टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वी शायोमीकडून हा प्रकार घडायला सुरुवात झाली आणि आता रियलमीसुद्धा त्याच वाटेने जात आहे!
realme 5i मध्ये 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 6.5-inch HD+ IPS 269 PPI डिस्प्ले ज्यामध्ये 20:9 aspect ratio आहे. कॅमेरासाठी 12MP मुख्य + 8MP अल्ट्रा वाईड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. मुख्य कॅमेरासाठी Sony IMX386 लेन्स आहे. यामध्ये Android 9 Pie आधारित ColorOS 6.0.1 ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनची किंमत ८९९९ असून हा फोन १५ जानेवारीपासून दुपारी १२ वाजता सेलद्वारे उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट व realme.com वर हा सेल सुरू होईल.
डिस्प्ले : 6.5-inch (16.5cm) mini-drop fullscreen
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 665 AIE
GPU : Adreno 618
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB
कॅमेरा : 12MP + 8MP wide-angle + 2MP Portrait + 2MP macro
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 5000mAh 10W charging power (5V, 2A inbox)
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6.0.1 Based on Android P
इतर : 802.11 ac Wi-Fi, Bluetooth 5.0
सेन्सर्स : GPS/Beidou/Galileo/A-GPS, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor, Fingerprint
रंग : Aqua Blue, Forest Green
किंमत : 4GB+64GB ₹८९९९
रियलमी लवकरच फिटनेस ट्रॅकरसुद्धा सादर करत असून त्यांची नवी पॉवरबँक आणि realme Buds Air Case सुद्धा येत्या काही दिवसात सादर होईल अशी शक्यता आहे.