मायक्रोसॉफ्टने काल त्यांचा क्रोमियम आधारित एज ब्राऊजर विंडोज आणि MacOS साठी सादर केला आहे. गेले काही महिने चाचणी स्वरूपात असलेला हा ब्राऊजर आता सर्वांसाठी उपलब्ध झाला. नव्या ब्राऊजरसाठी त्यांनी गूगल क्रोममध्ये वापरलेल्या Chromium या ब्राऊजर इंजिनचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचं जाहीर केलं होतं. इंटरनेट एक्सप्लोरर कालौघात मागे पडत गेल्यावर त्यांनी स्वतःच्या एज इंजिन आधारित एज ब्राऊजर सादर केला विंडोज १० मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. मात्र या ब्राऊजरचा वापर फारच कमी लोक करत असल्याचं लक्षात आल्यावर मायक्रोसॉफ्टने आता क्रोमियमचा मार्ग स्वीकारला आहे.
Download Microsoft Edge Browser : www.microsoft.com/en-us/edge
नव्या एज ब्राऊजरमध्ये तुम्ही गूगलच्या क्रोममध्ये उपलब्ध असलेले सर्व एक्स्टेंशन्स वापरू शकाल. हा मोठा फायदा एज वापरकर्त्यांना मिळणार आहे. गूगल क्रोममध्ये उपलब्ध सोयींसह एज आणखी काही खास सोयी सुद्धा जोडल्या आहेत.
हा ब्राऊजर आता तुम्ही वरील लिंकवरून डाउनलोड करून वापरू शकाल. पुढील विंडोज १० अपडेटमध्ये हा आधीपासून जोडलेला असणार आहे. आता इन्स्टॉल केल्यावर जुना एज ब्राऊजरला रिप्लेस करेल.
क्रोमियम हे गूगलतर्फे डेव्हलप केलं जाणारं ब्राऊजर इंजिन असून ते गूगल क्रोम, ऑपेरा अशा जवळपास सर्व प्रमुख ब्राऊजरमध्ये समाविष्ट केलेलं आहे. क्रोमियम सध्या ओपन सोर्स उपलब्ध असून त्यावर आधारित ब्राऊजर कोणीही मोफत तयार करू शकतो.
आता फक्त मायक्रोसॉफ्ट एज आणि फायरफॉक्स हे दोनच ब्राऊजर क्रोमियमचा वापर करत नव्हते. मात्र आता एजने सुद्धा क्रोमियमची वाट धरली आहे. यावर अनेक तज्ज्ञांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती कि यामुळे सर्वच इंटरनेट वापर क्रोमियमकडे एकवटून जाईल. यावर फायरफॉक्सने खास पोस्ट लिहून ते यापुढेही एक पर्याय म्हणून फायरफॉक्स आधारित ब्राऊजर उपलब्ध असेल.
Search Terms Microsoft’s Chromium based new Edge Browser now available to download for everyone