अलीकडे वाढलेल्या स्मार्टफोन वापरासोबत काही अडचणीसुद्धा जोडून येतात. यापैकी सर्वात वाईट म्हणता येईल असा अनुभव म्हणजे फोन हरवणे आणि तो स्मार्ट असूनही त्याला शोधता न येणे! आपल्या आयुष्यात आपण आता बऱ्याच गोष्टींसाठी स्मार्टफोनवर अवलंबून असतो आणि अशावेळी जर फोन हरवला तर ती घटना नक्कीच अनेक दृष्टीने त्रासदायक असते. महत्वाचे कॉल्स, मेसेज मिळणं थांबतं, डेटा हरवतो, समजा तो हरवलेला फोन कुणाच्या हाती लागला तर तो डेटा त्यांना मिळण्याची शक्यता असते अशा बऱ्याच गोष्टी घडू शकतात ज्यामुळे काही दिवस का होईना हरवलेल्या फोनचे परिणाम जाणवत राहतात. आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांपैकी कुणाचा तरी फोन नक्कीच हरवला असेल किंवा चोरीला गेला असेलच.
तर आता हे हरवलेले फोन शोधण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या मार्गांपेक्षा वेगळा पर्याय सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) या सरकारी संस्थेतर्फे हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असून याद्वारे आपण आपला हरवलेला स्मार्टफोन शोधू शकतो…!
CEIR सध्याच्या गूगलच्या फाइंड माय डिव्हाईससारख्या पर्यायांपेक्षा उत्तम का आहे ?
CEIR बद्दल काही महिन्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. हा प्रकल्प हळूहळू विविध शहरात उपलब्ध करून दिला जात आहे. आता ही सेवा मुंबई (आता महाराष्ट्र राज्य) व दिल्ली या शहरात उपलब्ध झाली आहे. या शहरातील फोन यूजर्स त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेल फोन्स शोधू शकतील. इतके दिवस उपलब्ध असलेल्या पर्यायात गूगलचा सर्व अँड्रॉइड फोन्समध्ये पाहायला मिळणारा Find My Device हा पर्याय सर्वात उत्तम होता. मात्र या पर्यायाला काम करण्यासाठी हरवलेल्या फोनचं इंटरनेट सुरू राहणं गरजेचं होतं त्याशिवाय काहीही करता येत नव्हतं. मात्र CEIR च्या या नव्या पर्यायामुळे इंटरनेट किंवा कसल्याही लॉगिन शिवाय केवळ IMEI नंबरद्वारे फोन्स शोधता येतील. IMEI क्रमांक हा जगातल्या प्रत्येक स्मार्टफोनला स्वतंत्र असा कोड असतो. जर फोन ड्युयल सिम असेल तर दोन आयएमईआय क्रमांक पाहायला मिळतील. तर केवळ या क्रमांकाच्या आधारे फोन शोधता येईल अशी यंत्रणा CEIR मध्ये तयार करण्यात आलेली आहे.
CEIR च्या मदतीने असा शोधा तुमचा हरवलेला फोन
- जर तुमचा फोन हरवला असेल तर प्रथम त्याची एक तक्रार जवळच्या पोलिस स्थानकात नोंदवा.
- तुमच्या टेलिफोन ऑपरेटरकडून नवं सिम घ्या
- त्यानंतर CEIR ची वेबसाइट (https://ceir.gov.in/Home/index.jsp) वर जा
- इथे तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI ब्लॉक करता येईल. जेणेकरून तुमचा फोन दुसऱ्या कुणाच्या हाती लागला तर त्यांना तो वापरता येणार नाही.
- ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हरवलेल्या फोनची माहिती विचारली जाईल. यामध्ये फोन क्रमांक, कंपनी, हरवलेलं ठिकाण, तारीख, नाव, पत्ता, ओळखपत्र, purchase invoice, पोलिस तक्रारीची प्रत, इ.
- त्यानंतर आलेला OTP टाका आणि फॉर्म सबमीट करा.
- त्यानंतर तुम्हाला एक Request ID मिळेल जो तुम्हाला फोन ट्रॅक करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे पाहण्यास मदत करेल!
फोन सापडल्यावर तो वापरण्यासाठी ब्लॉक केलेला IMEI अनब्लॉक करावा लागेल. यासाठी पुन्हा एकदा CEIR च्या वेबसाइटवर जा आणि Unblock Found Mobile पर्याय निवडा. इथे तुम्हाला Request ID आणि मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. इथेच तुम्हाला IMEI चा स्टेट्ससुद्धा समजेल!
Know Your Mobile (KYM) हा पर्याय सुद्धा उपलब्ध असून यामुळे तुम्ही नव्याने खरेदी केलेला फोन किंवा सेकंड हँड फोन यांच्या IMEI ची सत्यता तपासता येईल. जर तो IMEI चोरीच्या फोनचा असेल तर तुम्हाला ती खरेदी रद्द करता येईल.
Search Terms : Find your lost phone location track live block lost or stolen phone IMEI CEIR Central Equipment Identity Register
खूप छान माहिती आहे तुमची..! अप्रतिम…!
https://shabda-kimaya.blogspot.com/
खूप महत्त्वाची माहिती दिली…
😔