कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ७ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान पार पडला! या वर्षीचा सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून येत आहे…
यावर्षी AI आधारित उपकरणे, 8K टीव्ही, वॉइस असिस्टंट, ड्युयल स्क्रीन आणि घडी घालता येतील असे डिस्प्ले असलेले फोन्स व लॅपटॉपप्स, इलेक्ट्रिक कार्स, घरगुती वापरासाठी स्मार्ट डिवाइसेस यांची रेलचेल होती! अनेक कंपन्या आणि त्यांची यावर्षी व भविष्यातील वाटचाल या कार्यक्रमात दिसून येते… या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड (सोनी, एलजी, सॅमसंग, लेनेवो, डेल, एसुस, एएमडी, टोयोटा, इ.) यावर्षी कोणती उत्पादने घेऊन आले आहेत ते पाहूया ….मराठीत नेहमीप्रमाणे फक्त मराठीटेकवर…
यावेळी मराठीटेकवर काही अपरिहार्य कारणांमुळे CES २०२० मधील घडामोडी लाईव्ह प्रकाशित करता आल्या नाहीत. त्यामुळे हा लेख उशिरा प्रकाशित होत आहे याची नोंद घ्यावी येत्या काही दिवसात यामधील काही उत्पादने आमच्या इन्स्टाग्रामवर आपण पाहू शकाल.
सोनी (Sony): यंदाच्या CES 2020 मध्ये सर्वात चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे सोनीची इलेक्ट्रिक कार! होय, सोनीने स्वतःची इलेक्ट्रिक कार यावेळी सादर केली. या कारचं नाव Sony Vision S असं असणार आहे. या स्मार्ट कार मध्ये सोनीचे सेन्सर, सोनीचं सॉफ्टवेअर, सोनीचीच एंटरटेंमेंट सिस्टम यांची जोड देण्यात आली आहे. ही कार बाजारात विक्रीस मात्र उपलब्ध होणार नाही हे सोनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. ही केवळ एक कन्सेप्ट कार असून याद्वारे सोनीने त्यांच्या भविष्यात सादर होणाऱ्या कार संबंधित उत्पादनांची माहिती देण्यासाठी ही कार खास तयार केली आहे.
कन्सेप्ट कार्स शक्यतो प्रत्यक्षात कधीच विक्रीसाठी आणल्या जात नाहीत. त्या फक्त कंपनीने तंत्रज्ञानासंबंधी सुरू असलेले प्रयत्न दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. खरतर यासाठी सोनीला स्वतंत्र कार तयार करण्याची गरज नव्हती मात्र तरीही त्यांनी त्यांचा तंत्रज्ञान या कारमध्ये प्रदर्शित केलं आणि आता ही कार CES 2020 ओळख बनली आहे!
यासोबत सोनीने केलेल्या प्लेस्टेशन ५ म्हणजे PS5 च्या लोगोचं अनावरणसुद्धा चर्चेत राहिलं ! PlayStation 5 हा गेमिंग कॉन्सोल 8K रेजोल्यूशन सपोर्ट करेल!
सॅमसंग (Samsung) : सॅमसंगने यावेळी CES मध्ये अनेक उत्पादनेही सादर केली आहेत. चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे Galaxy Chromebook, Galaxy Note 10 Lite व Galaxy S10 Lite.
Neon Project ज्यामध्ये व्हिडीओ रोबॉट मानवी हावभाव करत संवाद साधतील हे अगदी खऱ्याखुऱ्या व्यक्तीप्रमाणे दिसतील आणि संवादहि नैसर्गिक वाटेल, Ballie नावाचा रोबॉट जो दैनंदिन कामात आपल्याला वेळोवेळी मदत करेल, Planta हा concept refrigerator फ्रिज जो घरीच भाज्या पिकवून देईल!, GEMS नावाचं उपकरणे जे दिव्यांगांना मदत करेल. Samsung Sero नावाचं उपकरण जे आपल्या सॅमसंग गॅलॅक्सी फोनसोबत जोडलं जाईल आणि फोनमधील स्क्रिन आहे अशी मोठ्या डिस्प्लेवर दिसेल. याचं वैशिष्ट्य म्हजे जर तुम्ही फोन आडवा केला (रोटेट) तर तो मोठा डिस्प्लेसुद्धा फिरून आडवा होतो! याशिवाय इतर उत्पादने जसे कि Galaxy Book Flex α, Odyssey curved QLED gaming monitors G9 and G7 सुद्धा सादर झाले.
Dell : डेलने यावेळी लॅपटॉप्ससोबत Alienware Concept UFO हे गेमिंग उपकरण सादर केलं असून यामध्ये विंडोज १० इंस्टॉल केलेलं असेल आणि आपण यावर पीसी गेमिंग खेळू शकाल. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा टॅब्लेट आकाराचाच आहे! सध्यातरी हे उपकरण प्रोटोटाईप म्हणूनच समोर आलं आहे.
डेलनेव्यतिरिक्त घडी घालता येईल असा टॅब्लेटसुद्धा सादर केला आहे!
निकॉन (Nikon) : Nikon D750 या प्रचंड गाजलेल्या फुल फ्रेम DSLR कॅमेराची पुढची आवृत्ती D780 निकॉनने CES मध्ये सादर करण्यात आली आहे. 24.5-megapixel फोटो, improved dynamic range, color reproduction आणि quality पाहायला मिळेल. Expeed 6 image processor, 4K UHD video recording at 30fps, ISO range of up to 51,200 (max at 204,800), 7 frames per second अशा सुविधा यामध्ये पाहायला मिळतील. याची किंमत भारतात ₹१,९८,९९५ (बॉडी) ₹२,४२,४९५ (किट लेनसोबत्स) इतकी आहे.
वनप्लस (OnePlus) : The OnePlus Concept One : तुमच्या फोनच्या मागे असलेल्या कॅमेराच्या बाहेर आलेल्या आकाराचा त्रास होत असेल तर वनप्लसचा हा कन्सेप्ट तुम्हाला नक्की आवडेल. मॅक्लारेन सोबत भागीदारी करून तयार केलेला हा फोन त्यांच्या कारच्या काचेप्रमाणे सुविधा असलेला कॅमेरा देतोय! या फोनमधील कॅमेरा वापरून झाल्यावर कॅमेरा अॅप बंद होताच सर्व कॅमेरा दिसेनासे होतात आणि कॅमेरासमोरील काच काळी होते. जेव्हा तुम्ही पुन्हा कॅमेरा अॅप सुरु कराल तेव्हाच ते कॅमेरे परत दिसू लागतील!
Withings ScanWatch : विथिंग्स या कंपनीने त्यांचं नवं स्मार्ट घड्याळ सादर केलं असून यामध्ये आरोग्यविषयक सुविधांसाठी नवं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलं आहे. ECG, atrial fibrillation, blood oxygen levels, झोपची नोंद, झोपेत श्वास बंद होण्याचा sleep apnea) अंदाज व्यक्त करणे अशा गोष्टी हातातल्या घड्याळात जोडण्यात या कंपनीने यश मिळवलं आहे.
लेनोवो : Lenovo ThinkBook Plus with secondary E Ink display : लेनोवोने हा लॅपटॉप सादर केला आहे ज्यामध्ये नेहमी प्रमाणे मुख्य डिस्प्ले तर आहेच सोबत याच्या मागे इ इंक डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे ज्यावर आपण लॅपटॉप न उघडता नोट्स घेऊ शकतो! यासाठी पेनचा समावेश केला आहे.
सोबतच Lenovo ThinkPad X1 Fold हा घडी घालता येईल असा डिस्प्ले असलेला लॅपटॉपसुद्धा सादर केला असून भविष्यात आपल्याला असे लॅपटॉप जागोजागी पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
SA-1 urban air taxi : ह्युंडाईने भागीदारीत तयार केलेली हि हवाई टॅक्सी उबरच्या Uber Elevate या सेवेसाठी करण्यात आलेली कन्सेप्ट आहे. शहरांमध्ये हवाई टॅक्सीसेवा याद्वारे पुरवण्यात येईल! यामध्ये पायलटला धरून पाच जण बसू शकतील ३२१ किमी/तास या वेगाने हि हवाई टॅक्सी उडू शकेल!
Bosch Virtual Visor : बॉश कंपनीने एक अनोखं उपकरण आणलं असून आता आपण कार्समध्ये पाहत असलेल्या सूर्यप्रकाश अडवणाऱ्या पट्ट्या पाहिल्या असतीलच. या बऱ्याच वेळा प्रवासादरम्यान एखाद दुसऱ्या वेळी तरी काम करत नाहीत आणि अचानक सूर्यप्रकाश डोळ्यांवर येतो त्यासाठी बॉशने आपोआप सूर्यप्रकाश आणि आपले डोळे यांच्या जागा ओळखून त्यानुसार डोळ्यावर अंधार करणारा डिस्प्ले बनवला आहे!
Mercedes-Benz Vision AVTR : मर्सेडिज आणि अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी भागीदारी करून हे भन्नाट डिझाईन असलेली कार तयार केली आहे. अर्थात हि सुद्धा कन्सेप्ट कारच आहे. हि कार तुमचा श्वासोच्छ्वास ओळखू शकते!
रेझर Razer : पीसी, लॅपटॉप्स, फोन्स नंतर रेझर आता रेस गेमिंग सिम्युलेटर बनवत आहे. याद्वारे तुम्ही प्रत्यक्ष स्पोर्ट्स कार/बाईक चालवत आहेत असा अनुभव येईल. गाडीच्या दिशेनुसार याची सीटसुद्धा अॅड्जस्ट केली जाईल! १२८ इंची वक्राकार स्क्रीन असून २०२ अंश फील्ड ऑफ व्ह्यू आहे! रेसिंग गेम सुरू असताना वळणे घेताना तर आणखी मजा येईल अशा सोयी यामध्ये जोडण्यात आल्या आहेत!
एलजी LG : कंपनीने गेल्यावेळी सादर केलेला गुंडाळला जाणारा डिस्प्ले असलेला rollable टीव्ही आता यावर्षी उपलब्ध होईल असं सांगितलं आहे. याशिवाय अधिक मोठे अधिक रेजोल्यूशन असलेले स्मार्ट टीव्ही सुद्धा सादर करण्यात आले. ThinQ Washer with AI ही कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आलेली वॉशिंग मशीन सादर झाली. ही मशीन टाकलेले कपडे कोणत्या प्रकारचे आहेत हे स्वतः ओळखेल!