टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आज झालेल्या कार्यक्रमात त्यांचा पहिला इलेक्ट्रिक पिकअप ट्रक जाहीर केला ज्याचं नाव Cybertruck असेल! हा ट्रक तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध होत असून हे २५० मैल (~४०२ किमी), ३०० मैल (~४८२ किमी) आणि ५०० मैल (~८०४ किमी) रेंज असलेले आहेत. या ट्रकची किंमत $39900 म्हणजे जवळपास २८,६३,००० रुपये असेल! ह्या ट्रक निर्मिती २०२१ मध्ये सुरू होईल असा अंदाज कंपनीला आहे. ज्यांना प्रिऑर्डर करायचा आहे त्यांना tesla.com/cybertruck वर जाऊन करता येईल. (टेस्ला कंपनी अद्याप भारतात आलेली नाही)
टेस्ला कंपनी फक्त इलेक्ट्रिक वाहने बनवते. यापूर्वी त्यांच्या कार्स, Semi ट्रक, सोलार पॅनल्स, घरांसाठी पॉवरवॉल बाजारात उपलब्ध आहेत. आता इलेक्ट्रिक पिकअप ट्रक आणून कंपनी त्यांची उत्पादनांची संख्या वाढवत विस्ताराच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. याचवेळी त्यांनी Tesla ATV (ऑल टेरेन व्हेइकल) सुद्धा सादर केली आहे. भविष्याचा विचार करून सौर उर्जेसारख्या स्त्रोतांचा वापर वाढवत त्याद्वारे उपलब्ध वाहने वाढवणं गरजेचं आहे. अमेरिकेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पहिले तिन्ही पिकअप ट्रक आहेत म्हणून आम्ही आता इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध करून देत आहोत असं इलॉन मस्क यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात या कारच्या काचांबद्दल बोलताना त्या काचेची शॅटरप्रूफ ताकद दाखवत असताना फेकलेल्या लोखंडी गोळ्याने मात्र खरंच काच फुटली! इलॉन मस्कनी चेष्टेत We’ll fix it in post म्हटलं.
Tesla Cybertruck Tri Motor AWD Specs
- 0-60 MPH : <2.9 SECONDS
- RANGE : 500+ MILES
- DRIVETRAIN : TRI MOTOR ALL-WHEEL DRIVE
- STORAGE : 100 FT
- VAULT LENGTH : 6.5 FT
- TOWING CAPACITY : 14,000+ LBS
- AUTOPILOT : STANDARD
- ADAPTIVE AIR SUSPENSION : STANDARD
- GROUND CLEARANCE : UP TO 16″
- APPROACH ANGLE : 35 DEGREES
- DEPARTURE ANGLE : 28 DEGREES
भविष्यात पेट्रोल, डिझेलसारख्या स्त्रोतांची होणारी स्थिती लक्षात घेऊन सर्वच वाहन निर्मात्या कंपन्यानी इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत प्रवाहाद्वारे चार्ज होऊन चालणाऱ्या गाड्या बनवण्यास सुरुवात केली पाहिजे. आता टेस्लाला मिळणारं यश पाहून इतर मोठ्या कंपन्याही पुढे सरसावू लागल्या आहेत. फोर्ड, GM, यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या येणाऱ्या कार्सची झलक दाखवली आहे. हे नक्कीच आशादायक चित्र आहे.