भारतात सध्या स्ट्रीमिंग सेवांचं पेव फुटलं आहे. अनेक मीडिया कंपन्या स्वतःच्या स्ट्रीमिंग सेवा, वेबस सिरिज, चित्रपट आणत आहेत. अनेक जाण इंटरनेटचाच वापर करून टीव्ही पाहण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे. अशा वाढत्या डिजिटल कंटेंटच्या मागणीला पाहण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देण्यास स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग स्टिक कारणीभूत ठरतात. हे नवं क्षेत्र लक्षात घेत फ्लिपकार्टने स्वतःची स्ट्रीमिंग स्टिक काल सादर केली आहे. अॅमॅझॉन फायर टीव्ही, गूगल क्रोमकास्ट, एयरटेल एक्सस्ट्रीम असे पर्याय उपलब्ध असताना फ्लिपकार्टच्या या MarQ TurboStream किती प्रतिसाद लाभेल हे पाहायचं…
Marq हा फ्लिपकार्टचा स्वतःचा ब्रॅंड असून ही स्ट्रीमिंग स्टिक या अंतर्गत फ्लिपकार्टवर ३४९९ किंमतीत उपलब्ध झाली आहे. यामध्ये अँड्रॉइड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केलेला आहे. गूगल असिस्टंटद्वारे व्हॉईस कंट्रोल सपोर्ट सुद्धा आहे. यामध्ये Chromecast सपोर्ट आहे आणि सोबत प्ले स्टोअरवर अॅप्ससुद्धा डाउनलोड करता येतील. हा एक अँड्रॉइड टीव्ही बॉक्स असल्यामुळे हे शक्य आहे. या स्टिकमध्ये Full HD (1920×1080) रेजोल्यूशनमध्येच स्ट्रीमिंग करता येईल. डॉल्बी डिजिटल ऑडिओ सपोर्ट आहे. या स्टिकमध्ये Quad Core प्रोसेसर, Mali 450 GPU, 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज देण्यात आलं आहे! यामध्ये इंटरनेटसही जोडलं जाण्यासाठी ड्युयल बॅंड वायफायची जोड देण्यात आली आहे.
MarQ by Flipkart Turbostream Media Streaming Device http://fkrt.it/XMZYXoNNNN
क्रोमकास्ट सपोर्ट असल्यामुळे तुमच्या फोनवरील कंटेंट तुम्ही टीव्हीवर मिरर करू शकता. या स्टिकद्वारे तुमच्या नॉन स्मार्ट टीव्हीला सहज स्मार्ट टीव्ही बनवता येईल. यासोबत येणाऱ्या रिमोटवर नेटफ्लिक्स, यूट्यूब, गूगल असिस्टंटसाठी खास बटन देण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर 60fps मध्ये व्हिडिओ पाहता येतील. शिवाय OTA सॉफ्टवेअर अपडेट्स दिली जातील.