सॅमसंगने काल त्यांच्या लोकप्रिय Galaxy A मालिकेत आणखी एक स्मार्टफोन भारतात सादर केला असून Galaxy A20s कमी किंमतीच्या फोन्समध्ये नवा पर्याय असेल. आधीच्या A20 मॉडेलच्या मानाने यामध्ये कामगिरी चांगली व्हावी या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले असून कॅमेरा, डिझाईन आणि इतर सोयींची जोड देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनर, 15W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. हा फोन ५ ऑक्टोबरपासून ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, सॅमसंग ऑनलाइन शॉप अशा ठिकाणी उपलब्ध होईलच.
Samsung Galaxy A20s
डिस्प्ले : 6.5″ HD+ Infinity-V display
प्रोसेसर : Snapdragon 450
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : 13MP + 8MP + 5MP
फ्रंट कॅमेरा : 8MP (F2.0)
रॅम | स्टोरेज : 3GB | 32GB, 4GB | 64GB, Expandable up to 512GB
बॅटरी : 4,000mAh 15W Fast charging USB Type C
रंग : Green, Blue and Black
सेन्सस : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Light Sensor, Proximity Sensor
किंमत :
₹११९९९ (3GB+32GB )
₹१३९९९ (4GB+64GB)
सॅमसंगचा हा नवा पर्याय डिस्प्ले आणि कॅमेराबाबतीत ठीक असला तरी यामध्ये स्टोरेजचे पर्याय किंमतीच्या मानाने महाग आहेत. A30s, A50s, A70s, M30s ला सध्या मिळत असेलेलं यश या फोनला मिळणं अवघड दिसत आहे. Galaxy M30s हा Amazon Great Indian Festival मध्ये सर्वाधिक विकला गेलेला फोन ठरला आहे.