६ सप्टेंबरला यूट्यूबच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत घोषणा करण्यात आली असून यापुढे 100 Million म्हणजे १० कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण करणाऱ्या यूट्यूब चॅनल्सना रेड डायमंड प्ले बटन देण्यात येईल! रेड डायमंड क्रिएटर अवॉर्डचं नाव अतिशय दुर्मिळ अशा लाल रंगाच्या हिऱ्यावरून देण्यात आलं आहे. अर्थात हे बटन मात्र काचेपासून बनवलेलं असेल जी लाल रंगाची असेल आणि संपूर्ण बटन हे एकसंध काचेचे बनवलेलं असेल.
हे बटन मिळवणारे जगातले पहिले दोन चॅनल्स म्हणजे भारतीय म्युझिक कंपनी टी सीरीज आणि प्युडीपाय – PewDiePie (फिलिक्स शेलबर्ज) हा स्वीडिश यूट्यूबर! यांच्यामध्ये बरेच दिवस १० कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठण्यासाठी स्पर्धा सुरू होती. यासाठी बऱ्याच ऑनलाइन मोहिमा घेऊन वादविवाद सुद्धा झाले. शेवटी टी सीरीजनेच सर्वात आधी १० कोटींचा टप्पा गाठला आणि थोड्या दिवसांपूर्वीच प्युडीपायनेही हा टप्पा ओलांडला आहे. अनेकांनी प्युडीपायला या निमित्ताने सपोर्ट जाहीर केला होता कारण तो एक स्वतंत्र क्रिएटर आहे तर टी सीरीज ही एक मोठी कंपनी आहे.
जरी दोन्ही चॅनल्सच्या चाहत्यांमध्ये मोठे वाद झाले असले तरी यामधून दोन्ही चॅनल्सनाच मोठा फायदा मिळाला आहे. त्यांचे व्ह्यूज वाढले आणि सबस्क्रायबर्ससुद्धा!
यूट्यूब प्ले बटन यूट्यूबर्सना दिलं जातं. यूट्यूबर्स म्हणजे असे लोक जे यूट्यूब या प्रसिद्ध व्हिडीओ शेरिंग साईटवर व्हिडीओ शेअर करतात आणि ज्यांनी कुठल्याही कंपनी/ब्रँडचे प्रतिनिधी म्हणून व्हिडीओ न टाकता स्वतःच्या किंवा एका ग्रुपच्या नावावर अपलोड केलेले असतात.
यूट्यूबकडून देण्यात येणारं प्ले बटन सबस्क्रायबर्सचा (ज्यांनी त्या चॅनलचे व्हिडीओच सभासदत्व स्वीकारलं आहे असे लोक) ठराविक टप्पा पार पडल्यावर देण्यात येतं. सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड असं तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बटन पाठवलं जातं. हे बटन केवळ व्हायरल किंवा टॉप १० सारखे व्हिडीओ टाकणाऱ्या चॅनल्सना दिलं जात नाही. यूट्यूब हे अवॉर्ड्स पाठवण्यापूर्वी स्वतः चॅनल्स तपासून नियम पाळले असल्याची खात्री करतं.
YouTube Creators Awards : Play Buttons
- 1,00,000 : Silver Play Button : १ लाखाचा टप्पा पार करणाऱ्यांना
- 10,00,000 : Gold Play Button : दहा लाखांचा टप्पा पार करणाऱ्यांना
- 1,00,00,000 : Diamond Play Button : १ कोटीचा टप्पा पार करणाऱ्यांना
- 10,00,00,000 : Red Diamond Button : दहा कोटींचा टप्पा पार करणाऱ्यांना
सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले यूट्यूब चॅनल्स!
- T Series
- PewDiePie
- 5 Minute Crafts
- Cocomelon – Nursery Rhymes
- SET India
- Canal KondZilla
- WWE
- Justin Bieber
- Dude Perfect
- Zee Music Company