रिलायन्स जिओने त्यांच्या फायबर ब्रॉडब्रॅंड (FTTH) सेवा आजपासून उपलब्ध होत असल्याचं जाहीर केलं असून सेवेबद्दल माहिती, प्लॅन्स जाहीर केली आहे. या सेवेची गेल्या वर्षभरापासून चाचणी सुरू असून आता जवळपास १६०० शहरांमध्ये ही ब्रॉडब्रॅंड इंटरनेट सेवा सोबत डीटीएच सेवा सुद्धा उपलब्ध होत आहे. याद्वारे जिओ 100Mbps ते 1Gbps पर्यंत वेग असलेलं इंटरनेट पुरवणार आहे.
जिओ फायबर सेवेची ठळक वैशिष्ट्ये
- अल्ट्रा हाय स्पीड ब्रॉडब्रॅंड (1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड!)
- मोफत व्हॉइस कॉलिंग, कॉन्फरन्स कॉल आणि इंटरनेट कॉलिंगसुद्धा
- टीव्हीद्वारे जिओ वेबकॅममार्फत व्हिडिओ कॉल आणि कॉन्फरन्सिंग (JioTVCamera)
- मनोरंजनासाठी विविध OTT सेवामार्फत चित्रपट, मालिका, गाणी उपलब्ध
- गेमिंगसाठी विविध पर्याय सेट टॉप बॉक्स सर्व कंट्रोलर्स करेल सपोर्ट! शिवाय जिओ फायबर गेमिंगसाठी झेरो लेटन्सी इंटरनेट पुरवेल
- होम नेटवर्किंग घरातील विविध खोल्यांमध्ये वायफाय मेश तयार करून इंटरनेट पुरवता येईल! फोटो, म्युझिक, व्हिडिओ शेयर करण्यासाठी सेवा उपलब्ध!
- सुरक्षा : यासाठी safety & surveillance solution उपलब्ध करून दिलं जाईल ज्यामध्ये डोर कॅमेरा, CCTV, बाळांकडे लक्ष ठेवण्यासाठी बेबी मॉनिटरचा समावेश (ही उत्पादने स्वतंत्र उपलब्ध)
- VR अनुभव : आभासी जगाची सफर घरबसल्या करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटचा समावेश थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव!
- जिओ होम गेटवे : हा थोडक्यात राऊटर असेल जो जिओ फायबरद्वारे वायफाय मार्फत सेवा पुरवेल.
जसे की तुम्ही वर दिलेल्या प्लॅन्समध्ये पाहू शकता जिओ फायबरचा बेस प्लॅन ६९९ पासून सुरू होत असून या प्लॅनमध्ये 100GB डेटा + 50GB मोफत डेटा (ही ऑफर सहा महिन्यांसाठीच असेल) देण्यात येईल. हा डेटा संपल्यावर स्पीड कमी करून 1Mbps करण्यात येईल. या वेगात पुढे अमर्याद इंटरनेट उपलब्ध असेल.
सर्वात मोठा प्लॅन दरमहा ८४९९ असून यामध्ये तब्बल 1Gbps स्पीड असलेलं इंटरनेट मिळणार आहे. ज्याला 5000GB पूर्ण वेग असेल तर हे संपल्यावर पुढे 1Mbps वेगात अमर्याद इंटरनेट वापरता येईल.
- प्लॅन किंमत/स्पीड/FUP अंतर्गत डेटा+मोफत डेटा
- ₹ 699/100Mbps/100GB+50GB
- ₹ 849/100Mbps/200GB+200GB
- ₹ 1,299/250Mbps/500GB+250GB
- ₹ 2,499/500Mbps/1250GB+250GB
- ₹ 3,999/1Gbps/2500GB
- ₹ 8,499/1Gbps/5000GB
- उजवीकडे असलेला अतिरिक्त मोफत डेटा सहा महिनेच मिळणार आहे.
जिओ फायबरच्या सर्वच प्लॅन्ससोबत फ्री व्हॉईस देण्यात आले आहेत. याद्वारे भारतात कोठेही मोफत कॉल्स करता येतील. यासाठी जिओचं JioCall हे अॅप वापरता येईल. यासोबत टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग या सेवा असतील. व्हिडिओ कॉलिंग सेवेची किंमत वार्षिक १२०० रुपये, गेमिंग सेवेची किंमत वार्षिक १२०० (झेरो लेटन्सी नेटसाठी), डिव्हाईस सेक्युरिटी सेवा वार्षिक ९९९ रुपयात उपलब्ध असेल.
जिओ फायबर सेवेची किंमत
जिओ फायबर सेवा घेण्यासाठी तुम्हाला २५०० रुपये डिपॉजिट भरायचं आहे (हे एकदाच द्यावं लागेल) यामधील १५०० रुपये परत मिळू शकतील तर उर्वरित १००० रुपये इंस्टॉलेशन चार्ज असेल.
जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत जिओ होम गेटवे, 4K Jio Set Top Box मोफत मिळेल. सोबत एक टीव्ही (गोल्ड आणि पुढील प्लॅन्समध्ये म्हणजे दरमहा १२९९ आणि त्यापुढील प्लॅन्स) मिळेल (अधिक माहिती पुढे) सोबत OTT सेवांद्वारे चित्रपट, मालिका, गाणी मोफत पाहता येतील!
- गोल्ड प्लॅन एक वर्षासाठी घेतल्यास Muse 2 Bluetooth speaker मिळेल.
- गोल्ड प्लॅन जर दोन वर्षांसाठी घेतला तर २४ इंची एचडी टीव्ही मिळेल.
- सिल्व्हर प्लॅन वर्षासाठी घेतल्यास Thump 2 Bluetooth speakers मिळतील.
- डायमंड प्लॅन वर्षासाठी घेतल्यास २४ इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
- प्लॅटिनम प्लॅन्स वर्षासाठी घेतल्यास ३२ इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
- टायटॅनियम प्लॅन वर्षासाठी घेतल्यास ४३ इंची 4K टीव्ही मोफत मिळेल!
जिओ फायबर सेवेची नोंदणी कशी कराल?
- www.jio.com वर जा किंवा MyJio अॅप घ्या
- JioFiber सेवेसाठी नोंदणी करा. तुमचा पत्ता, नाव, मोबाइल क्रमांक विचारला जाईल.
- जर तुमच्या भागात जिओ फायबर सेवा असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल
- पुढील प्रक्रिया त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल.
- दरमहा/चौमाही/वार्षिक अशा कोणत्याही प्लॅन्सने रीचार्ज केल्यास ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल.
लेख अधिक माहिती मिळेल त्यानुसार अपडेट केला जात आहे याची नोंद घ्यावी.
Search Terms : Jio Fiber Broadband Plans, Price, Registration, Offers, Speed
Very good