रियलमी या ओप्पोकडे मालकी असलेल्या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात आता चांगलाच जम बसवला असून योग्य किंमतीत उत्तम फोन्स सादर करत असल्यामुळे यांचे फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आता त्यांनी नवा Realme XT सादर केला असून हा भारतातला पहिला ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोन असणार आहे. यासाठी त्यांनी Samsung GW1 64MP सेन्सरचा वापर केला असून त्यामध्ये ISOCELL Plus तंत्राची जोड देण्यात आलेली आहे. या फोनमध्ये 6.4″ SuperAMOLED डिस्प्ले देण्यात आला असून Snapdragon 712 AIE प्रोसेसर आहे. VOOC Flash Charge द्वारे फोन फास्ट चार्ज होईल. हा फोन १६ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. यावेळी त्यांनी रियलमी पॉवरबँक आणि रियलमी बड्स वायरलेससुद्धा सादर केले आहेत.
Realme XT Specs
डिस्प्ले : 6.4″ Super AMOLED Display Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 712AIE
GPU : Adreno 616
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1
कॅमेरा : 64MP Primary Lens + 8MP Ultra Wide-Angle Lens + 2MP Portrait Lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 4000mAh VOOC Fast Charge 3.0 (In Box 20W charger)
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 based on Android 9.0 Pie
सेन्सर्स : Gyroscope, Accelerometer, Distance sensor, Electronic compass, Vibration motor, Ambient light sensor
इतर : In-screen fingerprint sensor, Dolby Atmos Sound, Bluetooth 5.0, USB Type-C
रंग : Pearl Blue, Pearl White
किंमत : १६ सप्टेंबर १२ वाजता फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध
₹15999 (4GB+64GB)
₹16999 (6GB+128GB)
₹18999 (8GB+128GB)
रियलमीने यावेळी Shot on Realme Global Photography स्पर्धा सुद्धा जाहीर केली आहे. $10,000 चं बक्षीस असून ही स्पर्धा आजपासून सुरू होऊन १५ डिसेंबरला संपेल. १ जानेवारी २०२० रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल! $shotonrealme
Realme Buds Wireless : या वायरलेस इयरबड्समध्ये १२ तासांची बॅटरी लाईफ असून १० मिनिटांची फास्ट चार्जवर हे १०० मिनिटे वापरता येतात! IPX4 splash resistance देण्यात आलेलं आहे ज्यामुळे व्यायाम करताना, हलक्या पावसात सुद्धा हे सहज वापरता येतील. Black & Yellow, Green, Orange या रंगात उपलब्ध होतील. यांची किंमत 1799 असून हे अॅमेझॉनवर १४ सप्टेंबर पासून मिळतील.
रियलमी पॉवरबँक 10000mAh क्षमतेची असून हिच्यामध्ये 12 Layer Circuit Protection देण्यात आलं आहे. ही 18W ने दोन्ही मार्गे फास्ट चार्ज होते/करते. USB Type C व type A दोन्हीचा समावेश! या पॉवरबँकची किंमत 1299 असून ही फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर सप्टेंबरच्या शेवटी उपलब्ध होईल.