शायोमीने आज आदर केला आहे असा फोन ज्यामध्ये पूर्ण फोनवर स्क्रीन गुंडाळलेल्या प्रमाणे जोडण्यात आली आहे! समोरच्या बाजूला असलेला डिस्प्ले मोठा करत करत आता शायोमी प्रथमच असं डिझाईन असलेला फोन जगासमोर सादर करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. येणाऱ्या काळात नॉच डिस्प्ले वगैरे प्रकार बंद होऊन असं काही सर्वच फोन्समध्ये पाहायला मिळू शकेल! या नव्या फोनचं नाव Mi MIX Alpha असं आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 108MP कॅमेरा सेन्सर असून या फोनला फ्रंट कॅमेराच नाही का तर या फोन उलट फिरवल्यास मागेसुद्धा डिस्प्ले आहेच त्याचा वापर करून त्यानेच सेल्फी काढता येते! याच कार्यक्रमात Mi FullScreen TV Pro, MIUI 11, Mi 9 Pro 5G सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये १८०.६ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आहे! याच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रेशर सेंसिटीव्ह बटन्सचा अनुभव देणारी स्क्रीन आहे त्यामुळे बाजूला आपण खरं बटन दाबल्यासारखा भास होईल. या फोनमधील सेन्सर AI च्या मदतीने आपण फोनचा कोणता भाग वापरत आहोत हे पाहून उर्वरित भाग बंद करेल. यामुळे पुढील भाग पाहत असताना मागील बाजूस चुकून टच होऊन काही क्रिया घडणार नाही. सध्यातरी शायोमी या फोनला कन्सेप्ट फोन म्हणत असली तरी हा फोन पूर्ण तयार दिसत असल्यामुळे लवकरच बाजारात उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
Mi Mix Alpha
डिस्प्ले : 7.92-inch flexible OLED screen with 2088×2250 pixels
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855 Plus
GPU : Adreno 640
रॅम : 12GB RAM
स्टोरेज : 512GB UFS3.0
कॅमेरा : 108MP Samsung Sensor + 20MP ultra wide-angle camera + 12MP telephoto camera
फ्रंट कॅमेरा : –
बॅटरी : 4050mAh 40W wired fast-charging
इतर : 5G
किंमत : RMB 1999 (~₹२,००,०००)