Lenovo Carme हे स्मार्टवॉच भारतात सादर झालं असून यामध्ये IPS कलर टचस्क्रीन बटन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच २४ तास आपल्या हृदयाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंगसुद्धा दिलेलं आहे. हे स्मार्ट घडयाळ IP68 रेटेड असल्यामुळे पाणी आणि धुळीपासून याचं संरक्षण होईल. फोनमध्ये येणाऱ्या फोन कॉल्स, मेसेजेसच्या नोटिफिकेशनबद्दल माहितीसुद्धा या घड्याळात मिळणार आहे. याची किंमत ३४९९ असेल आणि हे क्रोमा व फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.
Lenovo Carme specifications
Lenovo Carme (HW25P) मध्ये 1.3″ IPS कलर डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला टचस्क्रीन बटनसुद्धा आहे. 2.5D curved surface डिझाईन असून जास्त उजेडात वेगवेगळ्या कोनाद्वारे पाहिल्यास सुद्धा डिस्प्ले सहज दिसेल. आरोग्य आणि फिटनेसच्या दृष्टीने यामध्ये अनेक सोयी देण्यात आल्या आहेत असं लेनेवो तर्फे सांगण्यात आलं आहे. पेडोमीटर, २४ तास हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप मॉनिटर जो झोपेवर लक्ष ठेवेल. यामधील स्पोर्ट्स मोडद्वारे बॅडमिंटन, सायकलिंग, रनिंग, फुटबॉल, स्विमिंग अशा गोष्टींवर लक्ष ठेवता येईल. सोबतच इतर सुविधा जय इतर स्मार्ट घड्याळयांमध्ये दिलेल्या पाहायला मिळतात त्या म्हणजे अलार्म, हवामान अंदाज, स्टॉपवॉच, सर्च फॉर फोन, स्मार्ट नोटिफिकेशन, इ.
हे लेनेवो स्मार्टवॉच एक चार्जवर तब्बल ७ दिवस चालेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये Bluetooth 4.2 जोडण्यात आलं असून iOS व अँड्रॉईड फोन्सना सपोर्ट आहे.
Lenovo Carme Black Smartwatch on Flipkart : http://fkrt.it/rPKLkoNNNN