अॅपलने त्यांच्या आयपॅड टॅब्लेट मालिकेत आता आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला असून हा नवा आयपॅड 10.2″ रेटिना डिस्प्लेसोबत मिळेल! या आयपॅडचं वैशिष्टय म्हणजे हा लवकरच उपलब्ध होत असलेल्या खास आयपॅडसाठीच्या iPadOS ला समोर ठेऊन तयार करण्यात आला आहे. यामध्ये आयपॅड ओएसच्या सर्व सोयींचा लाभ घेता येईल. याला अॅपल पेन्सिल सपोर्ट आहे. सोबत आता बाहेरून किबोर्डसुद्धा जोडता येणार आहे. हा आयपॅड 7 Gen मध्ये गणला जाईल. आता आयपॅड, आयपॅड प्रो व आयपॅड मिनी असे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत.
अॅपलची ही नवी उत्पादने 100 percent recycled aluminium पासून बनवलेली आहेत! या आयपॅडचं अमेरिकेत प्रिबुकिंग सुरू झालं असून हा ३० सप्टेंबरपासून भारतीय दुकानांमध्ये मिळायला सुरुवात होईल.
iPad 10.2″ 2019
डिस्प्ले : 10.2-inch 2160-by-1620-pixel resolution at 264ppi
कॅमेरा : 8-megapixel camera ƒ/2.4
फ्रंट कॅमेरा : 1.2-megapixel photos ƒ/2.2
प्रोसेसर : A10 Fusion chip with 64‑bit architecture, Embedded M10 coprocessor
स्टोरेज : 32GB or 128GB
ऑपरेटिंग सिस्टम : iPadOS
बॅटरी : 10 hours of battery life
सेन्सर्स : Touch ID, Three‐axis gyro, Accelerometer, Barometer, Ambient light sensor
इतर : Support for eSIM, Bluetooth 4.2
रंग : Space gray, silver and gold
किंमत : ₹२९९०० (WiFi Only), ₹४०९०० (WiFi+Cellular)