शायोमीने त्यांच्या अँड्रॉइड वन आधारित स्मार्टफोन मालिकेतील तिसरा फोन Mi A3 आज भारतात सादर केला असून हा फोन Mi A2 नंतर बऱ्याच कालावधीनंतर उपलब्ध होत आहे. यामध्ये गेल्या मॉडेलच्या तुलनेत डिझाईन, हार्डवेअर, कॅमेरा, बॅटरी असं सर्वच नवीन पहायला मिळत आहे. Mi A3 चा भारतातला पहिला सेल २३ ऑगस्टला अॅमेझॉन व mi.com वर असणार आहे. हा फोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध होत असून 4GB रॅम व 64GB स्टोरेज ज्याची किंमत १२९९९ असेल आणि दुसरा 6GB RAM व 128GB स्टोरेज ज्याची किंमत १५९९९ असणार आहे. हा फोन More than White, Not just Blue व Kind of Grey या तीन रंगामध्ये मिळेल. हा फोन Splash-proof आहे.
Mi A3 मध्ये मोठी बॅटरी, हेडफोन जॅक, IR ब्लास्टर, 48MP मुख्य + 8MP अल्ट्रा वाईड + 2MP पोर्ट्रेट असे तीन कॅमेरा, फ्रंट कॅमेरा 32MP आहे. याचा डिस्प्ले 6.08-inch AMOLED 1560 x 720p असून याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापेक्षा कमी किमतीमध्ये शायोमीच्याच फोन्समध्ये FHD डिस्प्ले दिला जातो मात्र A3 मध्ये HD डिस्प्लेच देण्यात आला आहे. किंमत लक्षात घेता यामध्ये बाकीच्या सुविधासुद्धा कमीच म्हणाव्या लागतील. शायोमीने हा फोन भारतात सादर करण्यात सुद्धा बराच उशीर केला आहे. याची एक गोष्ट इतर शायोमी फोन्स पेक्षा वेगळी ठरते ती म्हणजे अँड्रॉइड वन आधारित ऑपरेटिंग सिस्टम. जी शायोमीच्या MIUI प्रमाणे नसून थेट गूगलने विकसित केलेल्या अँड्रॉइड प्रमाणे असते. या फोनला Android Q अपडेट सुद्धा देण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली आहे.
Xiaomi Mi A3 Android One Specs
डिस्प्ले : 6.08″ Super AMOLED HD Display Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 665
GPU : Adreno 610
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1
कॅमेरा : 48MP Primary Lens + 8MP Ultra Wide-Angle Lens + 2MP Portrait Lens
फ्रंट कॅमेरा : 32MP f/2.0
बॅटरी : 4030mAh Quick Charge 3.0 18W Fast Charge (In Box 10W charger)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One 9.0 Pie
सेन्सर्स : Gyroscope, Accelerometer, Distance sensor, Electronic compass, Vibration motor, Ambient light sensor
इतर : In-screen fingerprint sensor, Bluetooth 5.0, USB Type-C, IR blaster
रंग : More than White, Not just Blue, Kind of Grey.
किंमत : २३ ऑगस्टला अॅमेझॉन व mi.com वर सेलद्वारे उपलब्ध
₹12999 (4GB+64GB)
₹15999 (6GB+128GB)