कॅननने आज दोन नवीन कॅमेरे सादर केले असून यामधील EOS 90D हा DSLR प्रकारचा असून EOS M6 II हा मिररलेस कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेराच्या क्षमता जवळपास सारख्या असल्या तरी त्यांच्या एकूण आकार आणि कॅमेरा बॉडीमध्ये बराच फरक आहे.
कॅननच्या या दोन्ही कॅमेरामध्ये 32.5MP चे APSC इमेज सेन्सर असून DIGIC 8 इमेज प्रोसेसर आहे. शटर स्पीड 1/16000 पर्यंत, क्रॉप न करता 4K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्युयल पिक्सल ऑटोफोकस, वायफाय, ब्लुटुथ आणि टाइप सी पोर्ट. दिसण्याच्या बाबतीत 90D नेहमीच्या DSLR कॅमेराप्रमाणे दिसतो तर M6 Mark II मिररलेस कॅमेरा प्रमाणे कॉम्पॅक्ट आहे.
या कॅमेरामध्ये त्यांच्या कामगिरीमध्ये थोडा फरक आहे, M6 Mark II 14 frames per second वेगात फोटो काढू शकतो सोबत AF & AE Tracking. तर 90D 10 Frames per second एव्हढया वेगात फोटो काढू शकतो. 90D चा डिस्प्ले पूर्ण फिरवता येतो तर M6 II चा फक्त वरखाली टिल्ट करता येतो. याशिवाय यांच्या किंमतीमध्ये सुद्धा फरक पहायला मिळतो. 90D ची किंमत $1199 (~₹८६०००) तर M6 II ची किंमत $849.99 (~₹६१०००) इतकी आहे. या किंमती केवळ कॅमेरा बॉडीसाठी आहेत. लेन्स स्वतंत्र खरेदी कराव्या लागतील किंवा किट लेन्स सुद्धा पर्याय आहेच.
यासोबत कॅननने त्यांच्या EOS R साठी दोन नव्या L Class लेन्स जाहीर केल्या आहेत. RF 15-35mm f/2.8 L IS USM जी ultrawide-to-wide zoom आहे तर RF 24-70mm f/2.8 L IS USM ही स्टँडर्ड झुम लेन्स आहे.