ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात जगात आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉनने त्यांचा अमेरिकेबाहेरील पहिला कॅम्पस बुधवारी सुरू केला आहे. हा जगातला आजवरचा सर्वात मोठा कॅम्पस ठरला आहे! अॅमेझॉनच्या भारतातील एकूण ६२००० कर्मचाऱ्यांपैकी १५००० कर्मचारी या एक ठिकाणी काम करतील! हा कॅम्पस हैदराबादमधील नानाक्रामगुडा येथे ९.५ एकर एव्हढया विस्तीर्ण जागेत पसरला आहे!
“गेल्या पंधरा वर्षात आम्ही भारतात मोठी गुंतवणूक केली असून ३० ऑफिस, १३ राज्यात ५० फुलफीलमेंट सेंटर्स सोबत शेकडो डिलिव्हरी व सॉर्टिंग सेंटर्स उभारली असून यामुळे २००००० नोकऱ्या तयार झाल्या आहेत.” अशी माहिती अॅमेझॉनचे भारतातील मॅनेजर अमित अगरवाल यांनी यावेळी दिली.
हा कॅम्पस तयार करण्यास तीन वर्षे लागली असून यामध्ये प्रार्थनास्थळ, शांत खोल्या, स्नानगृहे, हेलीपॅड, ओपन कॅफे अशा गोष्टींचाही समावेश आहे अशी माहिती अॅमेझॉनचे रियल इस्टेट मॅनेजर शोटलर यांनी दिली. या कॅम्पसमध्ये आयफेल टॉवेरच्या तुलनेत अडीचपट जास्त स्टील वापरण्यात आलं आहे! इमारत उभारत असताना २००० कामगार दररोज काम करत होते.
सध्या अॅमेझॉनचं ४००००० स्क्वे. फुट परिसरात पसरलेलं मोठं फुलफीलमेंट सेंटरसुद्धा हैदराबादमध्येच आहे.
अधिकृत माहिती : https://blog.aboutamazon.in/our-business/owned-and-loving-it