व्हॉट्सअॅपने त्यांच्या दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भारतात तब्बल ४० कोटी लोक दरमहा व्हॉट्सअॅप वापरत असल्याची माहिती दिली! दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपचे भारतात २० कोटी यूजर्स होते. सध्या भारतात एकूण ४५ कोटी स्मार्टफोन यूजर्स असल्याच सांगितलं जातं त्यापैकी ४० कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात यावरून त्याची व्याप्ती लक्षात येईल!
अँड्रॉइड, iOS सोबत इतर ऑपरेटिंग सिस्टम्सवर व्हॉट्सअॅप उपलब्ध आहे. KaiOS जी जिओफोनमध्ये जोडलेली आहे तिच्यावर सुद्धा लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरत आहेत. व्हॉट्सअॅपचे जगभरात दरमहा जवळपास दीडशे कोटी यूजर्स आहेत.
व्हॉट्सअॅप आता लवकरच व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) नावाची पेमेंट सेवा सुरू करणार असून त्याची चाचणी सुरू आहे. सरकार तर्फे परवानगी मिळवण्याची प्रक्रियेमुळे सध्या या लॉंचला उशीर होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या आधीच लोकप्रिय असलेल्या फोनपे, गूगल पे, पेटीएम यांना व्हॉट्सअॅप पे चांगलीच स्पर्धा निर्माण करू शकेल.