मारिओसारख्या गेम्स बनवणाऱ्या निंटेंडोने त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या पोर्टेबल हँडहेल्ड गेमिंग कॉन्सोल Nintendo Switch ची स्वस्त आवृत्ती सादर केली असून यामध्ये सुविधा कमी असल्या तरी हा कॉन्सोल मुख्यतः पोर्टेबल म्हणजेच कुठेही घेऊन जाता येईल असा गेमिंग कॉन्सोल म्हणूनच पुढे आणत आहे! याची किंमत $200 (~₹१४०००) इतकी असणार आहे! हा २० सप्टेंबरपासून अमेरिकेत उपलब्ध होईल.
निंटेंडो स्विच लाइट आवृत्तीमध्ये 5.5″ HD रेजोल्यूशन असलेली स्क्रीन देण्यात आली असून मूळ स्विचमध्ये 6.2″ स्क्रीनचा समावेश होता. तसेच मूळ स्विचमध्ये असणारी टीव्हीला जोडण्याची स्विच लाइटला देण्यात आलेली नाही. यामुळे काही जणांची नक्कीच निराशा झाली असणार. मात्र निंटेंडो या नव्या कॉन्सोलला फक्त पोर्टेबल रुपामध्येच आणण्याची तयारीत असल्यामुळे हे साहजिकच होतं. यामध्ये बाजूला असणारे जॉयकॉन्ससुद्धा काढता येणार नाहीत. मात्र याची बॅटरी लाईफ आधीच्या स्विचपेक्षा जवळपास अर्धा तास अधिक म्हणजे सहा-सात तास इतकी आहे!
Nintendo Switch Lite console
Screen : Capacitive touch screen / 5.5 inch LCD / 1280×720 resolution
CPU/GPU : NVIDIA customised Tegra processor
System memory : 32 GB
Communication : Wireless LAN (IEEE 802.11 a/b/g/n/ac compliant) / Bluetooth 4.1 / NFC
Speakers Stereo
USB terminal USB Type-C terminal
Audio jack Stereo output
Game card slot : Exclusively for Nintendo Switch cards. microSD card slot
Sensors : Accelerometer / gyroscope
Operating environment Temperature: 5 – 35°C / Humidity: 20 – 80%
Internal battery Lithium ion battery / battery capacity 3570mAh
Battery life Battery life can last for more than six hours
Charging time 3 hours approx.