ट्रायने जाहीर केलेल्या माहितीनुसार मे २०१९ च्या अहवालामध्ये भारतातली सर्वात नवी टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने एयरटेलला मागे टाकत आता एकूण ग्राहकांच्या संख्येत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये आलेल्या जिओचे आता ३२.२९ कोटी ग्राहक असून एकूण मार्केटपैकी २७.८% हिस्सा आहे. एयरटेलकडे आता ३२.०३ कोटी ग्राहक असून त्यांच्याकडे मार्केटचा २७.६% हिस्सा आहे. पहिल्या स्थानावर व्होडाफोन-आयडिया असून या कंपन्या काही महिन्यापूर्वी एकत्र आल्या आहेत. त्यांच्याकडे ३८.७५ कोटी ग्राहक असून ३३.३६% मार्केटचा हिस्सा आहे.
एयरटेल व व्होडाफोन सध्या ग्राहक गमावत आहेतच मात्र एकट्या मे महिन्यातच एयरटेलचे १५ लाख तर व्होडाफोनचे ५७ लाख ग्राहक कमी झाले. त्याचवेळी जिओचे मात्र ८१ लाखांनी ग्राहक वाढले आहेत!
TRAI Official Data : Telecom Subscription Data as on 31st May, 2019