रास्पबेरी पाय हा छोट्या आकाराचा कॉम्पुटर असून याला आपण हवं तसं कोड करून आपल्याला हवे ते सुटे भाग जोडून आपल्याला हवं असलेलं काम करून घेऊ शकतो. याच्या लहान आकारामुळे हा अगदी शर्टच्या खिशातही सहज बसू शकतो! नवनव्या मॉडेलनुसार यामधील क्षमता सुद्धा वाढवण्यात डेव्हलपर रास्पबेरी पाय फाउंडेशन यशस्वी झालं आहे. बऱ्याच इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना याबद्दल थोडी तरी माहिती असेलच. DIY प्रोजेक्ट्ससाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
तर आता या रास्पबेरी पाय ची Raspberry Pie 4 ही नवी चौथी आवृत्ती आली असून यामध्ये आता आणखी सुधारित हार्डवेयरचा समावेश केलेला आहे! हा आता 4GB रॅम पर्यायासोबत मिळेल. यामध्ये व्हिडीओ आउटपुटसाठी आता दोन 4K HDMI पोर्ट्स मिळतील! सोबत फास्टर CPU, GPU, ईथरनेट, ड्युअल बँड वायफाय, दोन USB 3 व दोन USB 2 पोर्ट्स मिळतील! याची किंमत मात्र आधीच्या आवृत्ती प्रमाणेच ठेवण्यात आली असून ती $35 (~ ₹२५००) पासून सुरु होते!
या नव्या 4GB RAM पर्यायामुळे हा आता जवळपास स्वस्त डेस्कटॉप कॉम्पुटरच्या क्षमतेप्रमाणे काम करू शकेल जी नक्कीच मोठी गोष्ट असणार आहे! 4K डिस्प्ले आउटपुटची सुद्धा अनेकांची मागणी या नव्या मॉडेलमध्ये पूर्ण करण्यात आली आहे! अगदी इलॉन मस्क यांनीही ट्विटर याबद्दल ट्विट केलं आहे!
Raspberry Pi 4 Specs
CPU : Quad-core 1.5GHz Broadcom
GPU : 500MHz VideoCore VI
Ports : USB Type-C port for power, Two Micro HDMI ports with two 4K monitors at 30fps, or single 4K monitor at 60fps alongside a 1080p display, Two USB 3 ports, two USB 2 ports, Gigabit Ethernet port
इतर : Bluetooth 5.0 rather than 4.1, Dual-band 802.11ac Wi-Fi, microSD storage card with maximum transfer rate of 50 Mbps, 40 pin GPIO connector with support for three more interfaces; I2C, SPI, and UART.
ऑपरेटिंग सिस्टिम : यासाठी आपल्याला एका microSD कार्डमध्ये NOOBS ही त्यांची स्वतःची ओएस वापरता येते किंवा Raspbian, Windows IoT Core सारखे इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
किंमत : $35(1GB), $45(2GB), $55(4GB)