एएमडी कंपनीने आज E3 2019 या गेमिंग कार्यक्रमात खास गेमिंगसाठी नवे प्रोसेसर व ग्राफिक्स कार्ड जाहीर केले असून यामधील Ryzen 9 3950X हा जगातला पहिला 16 Cores असलेला गेमिंग सीपीयू असल्याच सांगितलं आहे! हा प्रोसेसर सप्टेंबरमध्ये उपलब्ध होत असून याची किंमत $749 इतकी असेल. इंटेलच्या 8 Cores असलेल्या प्रोसेसर्सना पुन्हा एकदा मागे टाकत आता जोमाने स्पर्धेत उतरल्याच सिद्ध केलं आहे!
इंटेलच्या प्रोसेसर्सना स्वस्त आणि चांगली कामगिरी करणारे पर्याय देण्यात AMD ने रायझन प्रोसेसर्स मालिकेद्वारे चांगलंच यश मिळवलं आहे. नव्या 3950X मध्ये 16-core, 32-thread, 3.5GHz base clock, 4.7GHz boost clock, 72MB of cache, 105W TDP, Zen2 Architecture या सोयींचा समावेश आहे! काही प्रमाणात त्यांच्या थ्रेडरिपर प्रोसेसरसोबत स्पर्धा करू शकेल म्हटलं तरी हरकत नाही!
या प्रोसेसर्ससोबत एएमडीने दोन नवे GPU म्हणजे ग्राफिक्स कार्डससुद्धा सादर केले आहेत. Radeon RX 5700 या मालिकेतील RX 5700 XT व RX5700 हे दोन नवे जीपीयू गेमिंगसाठी उत्तम पर्याय ठरतील. यामध्ये नव्या Navi Architecture च समावेश असेल.
RX5700 XT मध्ये 1605MHz Base Clock, 1755MHz Game Clock, 1905 Boost Clock, 2560 Stream Processors, 8GB GDDR6 Memory, 40 Compute Units पाहायला मिळतील! याची किंमत $499 असणार आहे.
RX5700 मध्ये 1465MHz Base Clock, 1625MHz Game Clock, 1725MHz Boost Clock, 2304 Stream Processors, 8GB GDDR6 Memory, 36 Compute Units पाहायला मिळतील! याची किंमत $379 असणार आहे.