वनप्लस या भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारात सर्वात पुढे असलेल्या कंपनीचा नवा OnePlus 7 Pro आज सादर झाला आहे. Flouid AMOLED सोबत HDR10+ सपोर्ट असलेला डिस्प्ले, 48MP कॅमेरा (ट्रिपल कॅमेरा सेटअप), डॉल्बी साऊंड, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर, वार्प चार्ज तंत्रज्ञान आणि मध्यम किंमत या गोष्टी फोनसोबत देण्यात आलेल्या आहेत. हा फोन १७ मे पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होईल. याची किंमत ₹४८९९९ पासून सुरू होईल. एसबीआय ग्राहकांना ₹२००० पर्यंत सूट मिळेल. जिओतर्फे प्लॅन्सअंतर्गत ₹९३०० चा फायदा!
या फोनचा फ्रंट (सेल्फी) कॅमेरा फोनमधून बाहेर येणारा पॉप अप प्रकारचा असून याबाबत वनप्लसने एक नवी गोष्ट जोडली आहे ती म्हणजे फोन पडत असल्यास हा बाहेर आलेला कॅमेरा आपोआप आत जाईल! डिस्प्लेसाठी आता Fluid OLED वापरुन 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत HDR10+ सपोर्ट देण्यात आल्यामुळे रंग अधिक आकर्षक व उठावदार दिसतील! गेमिंगसाठीही अनेक सोयी देण्यात आल्या असून यासाठी Fnatic या इ स्पोर्ट्स टिमसोबत भागीदारी करून Fnatic Mode देण्यात आला आहे जो गेमिंग वेळी फोन पूर्ण क्षमतेने वापरला जाईल आणि इतर गोष्टींनी मध्येच काही अडचण येणार नाही याची काळजी घेइल! हा फोन वॉटर रेझिस्टंट असल्याच सांगण्यासाठी हा फोन पाण्याच्या बादलीत टाकून दाखवला असून किंमत कमी ठेवण्यासाठी अधिकृत रेटिंग्स सर्टिफिकेट देण्यात येणार नसल्याचं स्पष्टीकरण आहे!
या OnePlus 7 Pro सोबत नेहमीच्या मालिकेत OnePlus 7 सुद्धा सादर करण्यात आलेला असून याची किंमत आधीच्या मॉडेल्स प्रमाणे ठेवण्यात आलेली आहे. OnePlus 7 ची किंमत ₹३२९९९ (6GB+128GB) आणि ₹३७९९९ (8GB+256GB) अशी आहे! यामध्ये 7 Pro मध्ये असलेलाच कॅमेरा असून प्रोसेसर, स्टोरेज, स्पिकर्स सुद्धा 7 Pro प्रमाणेच असतील. डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच असलेला असेल. या दोन फोन्ससोबत वनप्लसने त्यांचे OnePlus Bullets Wireless 2 इयरफोन्ससुद्धा सादर केले असून यांची किंमत ५९९० असेल!
OnePlus 7 Pro Specs :
डिस्प्ले : 6.67″ Fluid AMOLED QHD+ 90Hz HDR10+ Support 3D Corning Gorilla Glass, 3120 x 1440 pixels 516ppi
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855 Octa-core, 7nm, up to 2.84 GHz
रॅम : 6GB/8GB/12GBwith RAM boost
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 48MP f/1.6 with Dual OIS Sony IMX586 Sensor + 8MP Telephoto Lens + 16MP Wide Angle Lens Multi Autofocus (PDAF+LAF+CAF)
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 4000mAh with 30W WARP 30 fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS based on Android 9 Pie
इतर : 2×2 MIMO, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, 2.4G/5G, Bluetooth 5.0, NFC, USB 3.1 GEN1, Type-C, Dual Stereo Dolby Atmos Speakers, Zen Mode, Fnatic Mode
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
रंग : Mirror Gray/Nebula Blue/Almond
किंमत : भारतात १७ मे पासून अॅमेझॉनवर उपलब्ध
6GB+128GB ₹४८९९९
8GB+128GB ₹५२९९९
12GB+256GB ₹५७९९९