मायक्रोसॉफ्टने आज व्हिज्युयल स्टुडिओ या त्यांच्या लोकप्रिय कोड एडिटरची ऑनलाइन आवृत्ती Visual Studio Online जाहीर केली आहे. ही आवृत्ती Visual Studio व Visual Studio Code यांच्यासोबत उपलब्ध असेल.
मायक्रोसॉफ्टची नवी ही सेवा प्रसिद्ध Visual Studio Code या त्यांच्या मोफत ओपन सोर्स डेस्कटॉप कोड एडिटरवर आधारित आहे. व्हिज्युयल स्टुडिओ कोडसाठी आता सध्या उपलब्ध सर्व प्लगिन्स ऑनलाइनसाठीही चालतील. IntelliCode या AI ची मदत घेत कोड डेव्हलपमेंट करणार्या टूलचाही व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइनला सपोर्ट असेल! सोबत लाईव्ह शेअरचा पर्याय असेल ज्यामुळे इतर सहकार्यांनाही कोडमधील बदल लाईव्ह पाहता येतील!
अर्थात ही सेवा केवळ ‘व्हिज्युयल स्टुडिओ कोड’ला सोबत म्हणून वापरता यावी या उद्देशानेच बनवण्यात आलेली आहे. लगेच काही बदल करणे, कोड रिव्यू अशा गोष्टी करणे ही प्रमुख कामे याद्वारे करता येतील म्हणजे डेस्कटॉप आवृत्तीची जागा घेण्याऐवजी तिच्यासोबत काम केलं जाईल. तूर्तास ही सेवा फक्त चाचणीसाठी असून नंतर ती सर्वांसाठी उपलब्ध होईल.
Visual Studio Online Link : https://online.visualstudio.com
Search Terms : Microsoft launched Visual Studio Online an Online Code Editor