घडी घालता येणार्या फोन्सची सॅमसंग गॅलक्सी फोल्ड व हुवावे मेट एक्सच्या रूपात चाहूल लागल्यानंतर आता जगातला पहिला घडी घालता येणारा विंडोज पीसी लेनेवोने आज त्यांच्या अॅक्सलरेट या कार्यक्रमात सादर केला आहे! Lenovo ThinkPad X1 foldable PC हा बाजारात उपलब्ध होण्यास तयार असल्याच बोललं जात आहे! मात्र हा प्रत्यक्षात उपलब्ध होण्यास २०२० उजाडेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत इतर पीसी निर्मातेसुद्धा त्यांची उत्पादने सादर करू शकतात.
Lenovo ThinkPad X1 foldable PC Specs :
ऑपरेटिंग सिस्टम : मायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रोसेसर : अद्याप जाहीर नाही
रॅम : अद्याप जाहीर नाही
ग्राफिक्स : Intel
स्टोरेज : अद्याप जाहीर नाही
डिस्प्ले : 13.3-inch 2k OLED 4:3 Touch and inking supported
पेन : Wacom AES
Ports: Two USB Type C
Audio : Stereo speakers (Dolby)
Wireless : W-Fi and 4G LTE
Camera : Front-facing
IR camera with Windows Hello
सध्यातरी हे घडी घालता येणार्या डिस्प्लेचं तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असलं तरी आपल्या आसपास दिसणार्या डिस्प्लेना अनेक वर्षानी नवं रूप या निमित्ताने मिळण्यास सुरूवात होईल हे नक्की…!