फेसबुकने आज झालेल्या F8 कार्यक्रमामध्ये लवकरच त्यांच्या वेबसाइट, अॅपमधील न्यूजफीड, ग्रुप्स, इव्हेंट्समध्ये करण्यात येणारे बदल जाहीर केले आहेत. यासोबत यूजर्सना शोधणं आणि वापरणं सोपं करतील अशी टूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत! या कार्यक्रमापूर्वी मार्क झकरबर्गने प्रायवसीवर लक्ष केंद्रीत असलेल सोशल प्लॅटफॉर्म आणत असल्याच सांगितलं होतं!
आता खाली फेसबुकच्या विविध सेवांमध्ये कोणते बदल करण्यात येणार आहेत ते पाहू…
मेसेंजर (Messenger) : खाजगी संभाषणासाठी मेसेंजरला पुढे आणण्याच ठरवण्यात आलं असून नेहमीच्या पोस्ट्स ऐवजी आता मेसेंजरद्वारेच आपण आपल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकू. ही मेसेंजर सेव आता डेस्कटॉपवरही स्वतंत्र वापरता येईल त्यामुळे मेसेंजरसाठी फेसबुकची वेबसाइट उघडावी लागणार नाही. येत्या वर्षात मेसेंजर पृथ्वीवरील सर्वात वेगवान मेसेजिंग अॅप असेल असा फेसबुकने दावा केला आहे! याची साईझ सुद्धा 30MB पेक्षा कमी करण्यात येईल!
आता मेसेंजरद्वारे व्हॉट्सअॅप व इंस्टाग्रामवरील यूजर्सना सुद्धा चॅट करत टेक्स्ट व व्हिडिओद्वारे एकमेकांशी संवाद साधता येईल!
फेसबुक (Facebook) : नव्या डिझाईनमध्ये मित्रांसोबत ग्रुप्सनाही मध्यभागी स्थान देण्यात येईल. हे डिझाईन वेबसाइट व अॅपवर सारखं पाहायला मिळेल. हे नवं अॅप डिझाईन अमेरिकेत आजपासून उपलब्ध होत आहे.
न्यूजफीड ऐवजी ग्रुप्सकडे अधिक वापर केला जाण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. फेसबुकसुद्धा आता शॉपिंग वेबसाइट प्रमाणे काम करेल. अॅपमधूनच आपण विक्रेत्याला पैसे देऊ शकू…!
यासोबत फेसबुक डेटिंग (Facebook Dating) सेवासुद्धा अमेरिकेत या वर्षाखेरीस उपलब्ध होईल. ज्यामध्ये आपण विविध लोकांना शोधून त्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकतो! आता secret crush नावाचा पर्याय जोडता येणार असून त्याही व्यक्तीने तुम्हाला secret crush द्वारे अॅड केल्यास तुम्हाला फेसबुकवर जोडण्यात येईल!
इंस्टाग्राम (Instagram) : : Explore पर्यायामध्ये आता शॉपिंग उपलब्ध करून देण्यात आलं असून खरेदी करण्यासाठी इंस्टाग्रामबाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही. इंस्टाग्राममधूनच पेमेंट करता येईल!
इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आता फोटो/व्हिडिओ असण्याची गरज नाही. केवळ टेक्स्ट असलेली सुद्धा स्टोरी तुम्ही टाकू शकाल! डोनेशन स्टीकर सुद्धा उपलब्ध ज्याद्वारे क्रिएटर्सना थेट पैसे पाठवता येतील!
व्हॉट्सअॅप (Whatsapp Business) : व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये मोठी सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या सेवेद्वारे विक्रेत्यांना त्यांच्या बिझनेसमधील उत्पादने कॅटॅलॉग रूपात (Product Catalogs) दाखवता येतील! मग यामधील आवडलेल उत्पादन थेट व्हॉट्सअॅपमधूनच खरेदी करता येईल!
Search Terms : Facebook announces app and website redesign instagram whatsapp to get shopping features messanger gets several features such as lesser download size, faster messaging app